आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Baba Gurmeet Ram Rahim Singh In Music Launch Of MSG Two

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'बिग बॉस\'च्या प्रश्नावर बोलले बाबा गुरमीत, \'MSG 2\'चे म्यूझिक केले लाँच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- बाबा गुरमीत राम रहिम)
 
मुंबई- बुधवारी (9 सप्टेंबर) मुंबईमध्ये डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा गुरमीत राम रहिम सिंह \'MSG 2\'च्या म्यूझिक लाँच इव्हेंटमध्ये पोहोचले होते. यावेळी त्यांनी \'बिग बॉस\'च्या आगामी पर्वामध्ये सामील होण्याचा उल्लेखसुध्दा केला. येथे बाबा गुरमीत राम रहिम यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले आहे. त्यावर त्यांची उत्तरेदेखील दिली. 
 
होणार \'बिग बॉस 9\'चे स्पर्धक
मागील अनेक दिवसांपासून बातम्या येत होत्या, की बाबा गुरमीत राम रहिम प्रसिध्द टीव्ही रिअॅलिटी शो \'बिग बॉस सीझन 9\'चा भाग होऊ शकतात. जेव्हा त्यांना याविषयी विचारण्यात आले तेव्हा त्यांनी सांगितले, \'आमच्या काही अटी आहेत, जर त्या लोकांनी आमच्या या अटी मान्य केल्या तर आम्ही नक्कीच या बिग बॉसमध्ये जाऊ.\' मात्र बाबा गुरमीत राम रहिम यांनी याविषयी स्पष्टीकरण दिले नाही, परंतु त्यांच्या बोलण्यावरून ते या शोमध्ये सामील होऊ शकतात. 
 
बाबाचा ग्लॅमरस अवतार- 
बाबा गुरमीत राम रहिम यांच्या वेशभूषेविषयी आणि त्यांच्या ग्लॅमरस अवतारामुळे अनेकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. अखेर का ते इतर साधू-संतांपासून वेगळे झगमग कपडे परिधान करतात? यावरसुध्दा त्यांच्याकडे उत्तर होते, \'तुम्हीच सांगा कोणत्या शस्त्रात किंवा वेदात लिहिले आहे, की बाबांनी असे कपडे परिधान करू नये. असे आयुष्य जगू नये. सिनेमात एका नायकाची दाढी लांब नसावी?\' प्रश्नाच्या बदल्यात प्रश्न करून त्यांनी सर्वांची बोलती बंद केली. 
 
हीरो होण्याची तयारी- 
बाबा गुरमीत यांचा चेहरा सामान्य हीरोपेक्षा वेगळा आहे आणि त्यांची बॉडीसुध्दा इतर हीरोसारखी नाहीये. अशात ते कशाप्रकारे लोकांच्या मनात स्थान निर्माण करतील? या प्रश्नावर त्यांचे उत्तर होते, \'मी सिनेमा लोकांच्या भल्यासाठी तयार केला आहे. मल वाटले, की मीच चांगल्याप्रकारे हे काम करू शकतो. जर तुम्हाला वाटत असेल, की आमचेसुध्दा 6 किंवा 8 पॅक्स अॅब्स असावे तो आम्ही तेही करू.\'
 
या उत्तराने बाबा गुरमीत यांनी पुढेदेखील सिनेमे बनवत राहण्याची आणि हीरोचे काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.     
 
18 सप्टेंबरला रिलीज होत असलेला \'MSG 2\' 8 महिन्यांपूर्वी आलेल्या \'MSG\'चा सीक्वेल आहे. त्या सिनेमातसुध्दा बाबा गुरमीत राम रहिमच मुख्य भूमिकेत होते. मात्र हा सिनेमा बॉक्स-ऑफिसवर खास कमाल दाखवू शकला नव्हता. 
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा \'MSG 2\'च्या म्यूझिक लाँचिंग इव्हेंटचे PHOTOS...