आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस नेत्याची इफ्तार पार्टी : सलमान-शाहरुख-कतरिनासह अवतरलं अख्खं बॉलिवूड! बघा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाबा सिद्दीकींच्या इफ्तार पार्टीत पोहोचलेले सेलिब्रिटी - Divya Marathi
बाबा सिद्दीकींच्या इफ्तार पार्टीत पोहोचलेले सेलिब्रिटी
मुंबईः काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी यांनी रविवारी मुंबईत इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत अनेक मान्यवर दिसले. सलमान खान आपल्या दोन्ही बहिणींसोबत या पार्टीत सहभागी झाला. त्याची धाकटी बहीण अर्पिता तिचा नवरा आयुष शर्मा आणि मुलगा अहिलसोबत दिसली. तर अलविरा खान तिचा नवरा अतुल अग्निहोत्रीसोबत पार्टीत दिसली.
सलमान म्हणाला, इफ्तारमध्ये महिलांनासुद्धा करुन घेतले पाहिले सामील..
- दोन वर्षांपूर्वी बाबा सिद्दीकी यांच्याच इफ्तार पार्टीत सलमान खान आणि शाहरुख खान आपापसांतील मतभेद विसरुन एकत्र आले होते. येथेच दोघे गळाभेट घेताना दिसले होते.
- बाबा सिद्दीकी यांनी सांगितले, की "सलमान आणि त्याची बहीण अलविरा यांनी इफ्तार पार्टीत महिलांनासुद्धा सामील करुन घेण्याचा सल्ला दिला आहे."
- या इफ्तार पार्टीत पुरुषांसोबत महिलांनीसुद्धा त्यांचा रोजा सोडला.
- पारंपरिक पद्धतीनुसार इफ्तार पार्टीत केवळ पुरुष मंडळी सहभागी होत असतात.
हे सेलिब्रिटी पोहोचले पार्टीत...
- नगमा, हेलेन, रश्मी देसाई, सुशील कुमार शिंदे, अशोक चौहान, इंद्र कुमार, साजिद आणि फराद, आमिर अली आणि संजीदा शेख, मधुर भंडारकर, कायनात अरोरा, सलमा आगा आणि त्यांची मुलगी इफ्तारमध्ये दिसल्या.

- शाकिब सलीम, हुमा कुरैशी, गोल्डी बहल, संजय निरुपम, गुलाम नबी आजाद, एमी जॅक्सन, एजाज खान, अनु मलिक, मनीष पॉल, सोनू सूद, ईशा गुप्ता, कार्तिक आर्यन, आदिती राव हैदरी आणि एली अवराम हे सेलेब्सुद्धा पार्टीत पोहोचले.

- डेविड धवन, आर माधवन, सूरज पंचोली आणि त्याची आई, तुषार कपूर, अनूप सोनी, करण आणि बिपाशा, सुभाष घई, अब्बास अली जफर, कतरिना कैफ, कबीर खान, अर्पिता खान, आयुष शर्मा आणि आहिल, अलवीरा खान हे सेलेब्स इफ्तारमध्ये पोहोचले.

- अतुल अग्निहोत्री, सुशांत सिंह, डिनो मोरिया, श्वेता तिवारी, प्रतीक बब्बर, गुरमीत चौधरी, सुरवीन चावला, हुसैन, जावेद जाफरी आणि नावेद हे सुद्धा यावेळी दिसले.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, पार्टीत पोहोचलेल्या सेलेब्सची खास झलक..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...