रणवीर सिंह-प्रियांका चोप्रा
भोपाळनंतर बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहने मुंबईमध्येसुध्दा 'बाजीराव मस्तानी' या आगामी सिनेमातील 'मल्हारी' गाण्याचे लाँचिंग केले. त्यासोबतच सिनेमाची अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रावर चित्रीत करण्यात आलेल्या 'पिंगा' गाण्याचे मेंकिंगसुध्दा यावेळी दाखवण्यात आले. यानिमित्तावर सिनेमाचे प्रमोशन करण्यासाठी प्रियांका टीव्ही शो 'क्वांटिको'च्या शूटिंगमधून ब्रेक घेऊन मुंबईत आली.
रणवीर-दीपिकापेक्षा सरस कुणी नाही-
'बाजीराव मस्तानी'च्या भूमिकेसाठी सलमान खान, ऐश्वर्या रायसारखे मोठे स्टार्स अॅप्रोच करण्यात आले होते. परंतु अखेर ही भूमिका रणवीर-दीपिकला मिळाली. यावर प्रियांका म्हणते, 'सिनेमा बनण्यासाठी 12 वर्षे लागले असले तरी रणवीर-दीपिकापेक्षा उत्कृष्ट कलाकार असूच शकत नाहीत.'
रणवीर-प्रियांकाने केला डान्स-
लाँचिंगदरम्यान रणवीरने 'मल्हारी' गाण्यावर परफॉर्मन्स केला, तसेच प्रियांकानेसुध्दा 'पिंगा' गाण्यावर ठुमके लावले. मीडियासोबत बातचीत करताना दोघांनी सिनेमाविषयी गप्पा मारल्या. यावेळी यांची मजेदार केमिस्ट्री लोकांना पाहायला मिळाली.
रणवीरने गायला पिंगा-
'मल्हारी' गाण्यात एर्नेजेटिक डान्स करणा-या रणवीरने यावेळी 'पिंगा'च्या कठिण स्टेप्ससाठी प्रियांका आणि दीपिकाची प्रशंसा केली. यावेळी त्याने स्वत: 'पिंगा' गाणे गायले.
नो कॉम्पिटीशन फॉर शाहरुख-
बॉक्स ऑफिसवर 'बाजीराव-मस्तानी'ची स्पर्धा शाहरुख खानच्या 'दिलवाले' सिनेमासोबत होणार का? यासाठी प्रियांका सिनेमा प्रमोट करण्यासाठी आली आहे, 'शाहरुखसोबत कोणतीच स्पर्धा नाहीये. हा आमचा सर्वांना सिनेमा आहे, त्यासाठी आम्ही सर्वजण मिळून प्रमोट करतोय.'
मी रणवीरची सीनिअर- प्रियांका
प्रियांकाने सांगितले, की ती रणवीरची सीनिअर आहे, म्हणून सिनेमात त्याची फिरकी घेतली आहे. दीपिका त्याची मैत्रीण आहे. म्हणून आम्ही दोघींनी मिळून रणवीरला खूप त्रास दिला. मात्र रणवीरचे म्हणणे आहे, की एकीकडे दीपिका आणि दुसरीकडे प्रियांका यांसारख्या दोन सुंदर अभिनेत्री असल्यावर कुणी कसा बिचारा असू शकेल.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या इव्हेंटमधील प्रियांका आणि रणवीरचे फोटो...