आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bajirao Mastanis New Song Deewani Mastani Released

‘बाजीराव…’चे ‘दीवानी-मस्तानी’ गाणे लाँच, ट्रॅडिशनल लूकमध्ये रॅम्पवर अवतरली दीपिका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(दीपिका पदुकोण)
 
रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण स्टारर \'बाजीराव मस्तानी\' सिनेमाचे नवीन गाणे \'दीवानी मस्तानी\' इरोज इंटरनॅशनलने आपल्या ऑफिशिअल वेबसाइटवर लाँच केले आहे. सोशल मीडियावर हे गाणे  #DeewaniMastani या नावाने ट्रेंड होत आहे. 
 
श्रेया घोषालने या गाण्याला आवाज दिला आहे. लिरिक्स गणेश चंदनशिवेचे असून संगीत स्वत: संजय लीला भन्साळी यांनी दिले आहे. 
 
गाणे लाँच करून इरोजने साइटवर लिहिले, \'Here it is! EXCLUSIVE: Watch the video of the song\' गायिका श्रेया घोषलने आपल्या टि्वटवर अकाऊंटवर गाणे शेअर करून लिहिले, \'‘I\'M BLOWN!!!!\'
 
सिनेमाच्या मुख्य कलाकारांनी आपआपल्या पध्दतीने सोशल मीडियावर गाण्याविषयी सांगितले, दीपिकाने लिहिले, \'Kehte hain yeh Deewani, Mastani ho gayi..’ वहीं, रणवीर ने भी कुछ इस तरह सॉन्ग की तारीफ की- ‘Was it love at first sight for Bajirao and Mastani\'
 
दिल्लीमध्ये लाँच केला होता लूक- 
दीपिकावर चित्रीत करण्यात आलेले हे गाणे मागील दिवसांत चर्चेत होते. \'मस्तानी\'च्या गेटअपमधील तिच्या फस्ट लूक आधीच खूप चर्चा एकवटली होती. त्यामुळे गाण्याविषयी लोकांची उत्सूकता वाढली होती. 
 
17 ऑक्टोबरला दिल्लीमध्ये होणा-या \'ब्लेंडर्स प्राइड फॅशन वीक\'मध्ये दीपिकाने \'मस्तानी\'चा लूक लाँच केला. त्यासाठी शोमध्ये खास आरशांच्या महलांचा सेटअप तयार करण्यात आला होता. शोमध्ये तिने ट्रॅडिशनल आऊटफिटमध्ये एंट्री घेतली. 
 
संजय लीला भन्साळीच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या सिनेमाचा ट्रेलर आणि एक गाणे (गजानना) रिलीज झालेले आहेत. सिनेमाची रिलीज डेट 18 डिसेंबर 2015 आहे. सिनेमात दीपिकाशिवाय रणवीर सिंह आणि प्रियांका चोप्रासुध्दा महत्वाच्या भूमिकेत आहेत. 
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या इव्हेंटची आणि दीपिकाची खास झलक...