आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Big B, Sonam, Aishwarya, Ranveer At Red Carpet Of Hello! Hall Of Fame Awards

सूनबाईंसोबत अवॉर्ड सेरेमनीत पोहोचले Big B, रेड कार्पेटवर सोनमसह अवतरले सेलेब्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोनम कपूर, अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय - Divya Marathi
सोनम कपूर, अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय
मुंबईः हॅलो! हॉल ऑफ फेम अवॉर्ड्स 2016 या अवॉर्ड सोहळ्याचे सोमवारी रात्री मुंबईत आयोजन करण्यात आले होते. या अवॉर्ड सेरेमनीत अभिनेते अमिताभ बच्चन त्यांच्या सूनबाई ऐश्वर्या राय बच्चनसोबत पोहोचले. ब्लॅक अँड व्हाइट लूकमध्ये बिग बींचा रुबाब बघण्यासारखा होता. तर ऐश्वर्याने अमित अग्रवालने डिझाइन केलेला कलरफूल गाऊन कॅरी केला. सोनम कपूर डिझायनर नईम खानच्या शिफॉन रेड गाऊनमध्ये क्लिक झाली. या स्टार्सनी अवॉर्ड केले आपल्या नावी...
*रणवीर सिंह- सुपरस्टार ऑफ द ईअर अवॉर्ड
*अमिताभ बच्चन- ज्वेल ऑफ द नेशन अवॉर्ड
*सोनम कपूर- क्रिटिक अवॉर्ड
*अनिल कपूर- टाइमलेस आयकॉन अवॉर्ड
*सिद्धार्थ मल्होत्रा- Haute Stepper अवॉर्ड
*ऋषी कपूर- लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड
*करण जोहर- क्रिएटिव्ह मेवरिक अवॉर्ड
*कनिका कपूर- पॉप्युलर चॉइस अवॉर्ड
ग्लॅमरस लूकमध्ये दिसले सेलेब्स
रणवीर सिंह, सिद्धार्थ मल्होत्रा, कनिका कपूर, चित्रांगदा सिंह, एमी जॅक्सन, ऋषी कपूर, नीतू कपूर, अथिया शेट्टीसह अनेक स्टार्सचा रेड कार्पेटवर ग्लॅमरस आणि स्टायलिश अंदाज बघायला मिळाला. अथिया शेट्टी कलरफूल गाऊनमध्ये दिसली. तर चित्रांगदा सिंहने डॉली जेचा आउटफिट कॅरी केला. एमी जॅक्सन शंतनू आणि निखिलच्या व्हाइट फ्रिल गाऊनमध्ये स्पॉट झाली.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा रेड कार्पेटवर अवतरलेल्या स्टार्सचा जलवा...