आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amitabh Bachchan Diwali Party, Deepika, Ranveer And Many Others Were Seen

The BIG bash: लाइमलाइटमध्ये राहिली बिग बींची दिवाळी पार्टी, अवतरले अख्खे बॉलिवूड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिग बींनी आयोजित दिवाळी पार्टीत पोहोचलेले बॉलिवूड सेलेब्स - अनिल कपूर, रितेश देशमुख, शिल्पा - राज कुंद्रा, वरुण धवन, अक्षय कुमार आणि अन्य - Divya Marathi
बिग बींनी आयोजित दिवाळी पार्टीत पोहोचलेले बॉलिवूड सेलेब्स - अनिल कपूर, रितेश देशमुख, शिल्पा - राज कुंद्रा, वरुण धवन, अक्षय कुमार आणि अन्य
गेल्या आठवड्यात बॉलिवूडमध्ये दिवाळी पार्ट्या रंगल्या. महानायक अमिताभ बच्चन, टीव्ही क्वीन एकता कपूर, शिल्पा शेट्टी यांच्या घरी दिवाळी पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या सर्वांत जास्त चर्चा झाली ती अमिताभ बच्चन यांनी आयोजित केलेल्या पार्टीची. बिग बींच्या दिमाखदार पार्टीने बॉलिवूडच्या दिवाळी माहोलला चार चांद लावले. हा दिव्यांचा सण साजरा करण्यासाठी बिग बींच्या प्रतिक्षा बंगल्यावर आकर्षक रोशनाई करण्यात आली होती. शिवाय बरेच आकाशदिवे लावण्यात आले होते. बिग बींचा मुलगा अभिषेक आणि सून ऐश्वर्या यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
कोणकोण पोहोचले होते पार्टीत...
या पार्टीत अख्खे बॉलिवूड अवतरले होते, असं म्हटलं तर वावगे ठरु नये. एरव्ही पार्ट्यांमध्ये फारसा न रमणारा अक्षयकुमार पत्नी ट्विंकल, मुलगा आरव आणि सासूबाई डिंपल कपाडियासोबत बिग बींच्या पार्टीत पोहोचला होता. हृतिक रोशन, कंगना रनोट, अनिल कपूर, जॅकलिन फर्नांडिस, परिणीती चोप्रा, नीलम, प्राची देसाई, अनू दिवान, विधू विनोद चोप्रा, रिमा जैन, सुधीर मिश्रा, अदिती राव हैदरी, तारा शर्मा, अर्शद वारसी, शबाना आझमी, अबू जानी, बोनम ईराणी, रणधीर कपूर, रोनित रॉय, रोहित रॉय, सोनम कपूर, संजय खान, जॅकी श्रॉफ, टायगर श्रॉफ, अब्बास-मस्तान, किर्ती सेनन, जावेद जाफरी, किरण जुनैजा-रमेश सिप्पी, वरुण शर्मा, प्रेम चोप्रा, बप्पी लहरी, साजिद नाडियाडवाला, प्रसून जोशी, दिव्या दत्ता, सिद्धार्थ मल्होत्रा, आलिया भट, करण जोहर, सुप्रिया पाठक आणि त्यांची मुलगी सनाह कपूर, अनुपम खेर, किरण राव, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, सोफी चौधरी हे सेलिब्रिटी पार्टीत दाखल झाले होते.
याशिवाय बॉलिवूडचा बादशाह किंग खान, नीता अंबानी, प्रीती झिंटा, नीता अंबानी, कतरिना कैफ, मनिष मल्होत्रा, नीता लुल्ला, निशिका लुल्ला, सिमी ग्रेवाल, नील नितीन मुकेश, हेमा मालिनी, इशा देओल, भरत तख्तानी, सुनील शेट्टी, माना शेट्टी, अथिया शेट्टी, अयान मुखर्जी, रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख, शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा, सोनू सूद, अमृता सिंह, निखिल द्विवेदी, मलायका अरोरा खान, विक्रम फडनवीस, अनू मलिक, जुगल हसंराज, डिनो मोरियासह अनेक सेलेब्सची मांदियाळी बिग बींच्या पार्टीत बघायला मिळाली.
यावेळी सर्वच सेलिब्रिटी ट्रेडिशनल लूकमध्ये पार्टीत अवतरले होते. या बिग बॅशमधील सेलेब्सची खास झलक बघा पुढील स्लाईड्समध्ये...