आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bipasha Celebrates Diwali With Karan’s Family! Time To Move On From ‘good Friends’ Tag?

बॉयफ्रेंडच्या कुटुंबासोबत बिपाशाचे दिवाळी सेलिब्रेशन, ‘good friends’चा टॅग पुसण्याची आली वेळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू आणि अभिनेता करण सिंग ग्रोवर नेहमीच एकमेकांचे चांगले मित्र असल्याचे सांगत असतात. एकत्र वर्कआउट करणे असो, वा परदेशात हॉलिडे एन्जॉय करणे, किंवा रेस्तराँमध्ये एकत्र वेळ घालवणे असो, ही जोडी अनेकदा एकत्र दिसत असते. मात्र अद्याप त्यांनी आपल्या प्रेमाची कबुली दिलेली नाही. 'गुड फ्रेंड्स'च्या टॅगसोबतच हे दोघे वावरत असतात.
असो, हे दोघे आपल्या नात्याची कबुली देतील तेव्हा बघू... पण यंदाचे यांचे दिवाळी सेलिब्रेशन बघता, त्यांचे कुटुंबीय मात्र त्यांच्या नात्याविषयी गंभीर आहेत, हे नक्कीच दिसून आले. करण आणि बिपाशानेच नव्हे तर दोघांच्या कुटुंबीयांनीसुद्धा एकत्र येऊन यंदाची दिवाळी थाटात साजरी केली. दिवाळीत क्लिक झालेल्या छायाचित्रांमध्ये बिपाशा एक्साइटेड दिसतेय. तर करणसुद्धा तिची साथ एन्जॉय करताना दिसतोय. या छायाचित्रांमध्ये बिपाशाचे वडीलदेखील त्यांच्यासोबत दिसत आहेत.
'अलोन' या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान करण आणि बिपाशाचे सूत जुळल्याचे म्हटले जाते. जॉन अब्राहमसोबत ब्रेकअप झाल्यानंतर हरमन बावेजासोबत तिचे सूत जुळल्याचे चित्र होते. काही काळानंतर दोघे लग्न करणार अशाही बातम्या आल्या होत्या. मात्र लवकरच हे दोघे वेगळे झाले. तर दुसरीकडे करण सिंग ग्रोवरने अभिनेत्री श्रद्धा निगमसोबत लग्न केले होते. नंतर त्याचे अफेअर कोरिओग्राफर निकोलसोबत होते. मग त्याने छोट्या पडद्यावरील अभिनेत्री जेनिफर विंगेटसोबत विवाह केला. मात्र बिपाशासोबत त्याची जवळीक वाढल्यानंतर जेनिफरपासून तो विभक्त झाला.
आता बिपाशा आणि करणचे भूतकाळातील एवढे लव्ह अफेअर्स गाजल्यानंतर आता हे दोघे पुढील किती दिवस एकमेकांची साथ देतात, हेही बघणे तसे औत्सुक्याचे ठरणार आहेच म्हणा...
पाहुयात करण आणि बिपाशाने एकत्र कशी साजरी केली यंदाची दिवाळी...