आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Fashionable : बी टाऊनच्या अॅक्ट्रेसेसना भावते गोटा पट्टीची चमचम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पारंपरिक वस्त्रांमध्ये गोटा पट्टी वर्कमुळे कपडे क्लासिक दिसतात. लग्न, फिल्म इव्हेंट आणि ब्रँड प्रमोशनपासून ते रॅम्पपर्यंत सेलिब्रिटी अशी वस्त्रे आवर्जून परिधान करतात. रुंद गोटापासून ते पातळ पट्टीवरील सोनेरी आणि रौप्य दोन्ही शेडमधील डिझाइन पसंत केली जात आहे. काही सेलिब्रिटिज अँटिक गोल्डन गोटाच्यादेखील चाहत्या आहेत. त्यामुळे लाइट शेडसोबत त्या परिधान करतात. डिझायनर्सही यामध्ये भरपूर प्रयोग करतात.
परिणीती चोप्रा
डिझायनर महिका मिरपुरीच्या ऑरेंज-पिंक लहंग्यामध्ये परिणीती. सर्व काम पातळ गोटापासून केले आहे.
दिया मिर्झा
लग्न समारंभाला रितु कुमारचा हा ग्रीन-क्रीम ड्रेस घातला होता. त्यावर लाइट गोटा वर्क आहे.
सोनाक्षी सिन्हा
ज्योत्स्ना तिवारीचा पिंक-रेड कॉम्बो असलेला लहंगा घातलेली सोनाक्षी. त्यावर फूल गोटा पट्टी वर्क आहे.
सोहा अली खान
सिल्क मटेरियलचा पिंक-गोल्डन कॉम्बो असलेला लाँग कुर्ता लहंगा घातलेली सोहा. पट्टी वर्कद्वारे नेकलाइनवर फुले आहेत, तर लहंगा-दुपट्ट्यामध्ये अँटिक गोल्डन पट्टी दिसत आहे.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, आणखी कोणकोणत्या अभिनेत्रींनी गोटा वर्कला पसंती दिली आहे...
बातम्या आणखी आहेत...