आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actresses Look In Amitabh Bachchan Diwali Bash

DIWALI PARTY : अभिनेत्रींनी दिली ट्रेडिशनल लूकला पसंती, पारंपरिक रुपात फुलले सौंदर्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडून - सोनम कपूर, सोनाली कुलकर्णी, गौरी खान, अदिती राव हैदरी, उषा जाधव - Divya Marathi
डावीकडून - सोनम कपूर, सोनाली कुलकर्णी, गौरी खान, अदिती राव हैदरी, उषा जाधव
बी टाऊनमध्ये गेल्या आठवड्यात महानायक अमिताभ बच्चन यांच्या घरी दिवाळी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत बी टाऊनचे अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. यावेळी कंगना रनोट, अदिती राव हैदरी, सोनाली कुलकर्णी, सोनम कपूर, दिव्या दत्ता, दीपिका पदुकोण, कतरिना कैफ, प्रीती झिंटा, जेनेलिया देशमुख, शिल्पा शेट्टी, मलायका अरोरा खान, अथिया शेट्टी, सोफी चौधरी, प्राची देसाई, गौरी खान, जॅकलिन फर्नांडिस, परिणीती चोप्रा, आलिया भटसह अनेक तारकांनी आपल्या उपस्थितीने पार्टीला चारचाँद लावले.
एरव्ही ग्लॅमरस आउटफिटमध्ये दिसणा-या या अभिनेत्री दिवाळी पार्टीत मात्र पारंपरिक पद्धतीने तयार होऊन आल्या होत्या. अनेक जणींनी साड्यांना पसंती दिली. तर काही जणी लहेंगा चोलीत उठून दिसल्या. जेनेलियाने सलवार सूटला पसंती दिली होती. बच्चन बहू ऐश्वर्याने एम्ब्रॉयडरी असलेला लाँग गाऊन परिधान केला होता. सर्वचजणी यावेळी अतिशय देखण्या दिसल्या.
या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला, बिग बींच्या पार्टीत या सर्व अॅक्ट्रेसेसचा कसा लूक होता, ते दाखवत आहोत...