आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Celebs At Masaba Gupta And Madhu Mantena Wedding Reception

रिसेप्शनमध्ये आई आणि पत्नीसोबत दिसला शाहिद, कंगनासह जमली सेलेब्सची मांदियाळी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः रविवारी रात्री शाहिद कपूरने पत्नी मीरासोबत डिझायनर मसाबा गुप्ता आणि निर्माता मधू मंतेना यांची रिसेप्शन पार्टी अटेंड केली. यावेळी शाहिदची आई नीलिमा अजीमसुद्धा उपस्थित होत्या. शाहिद आणि मीरा यावेळी स्टायलिश लूकमध्ये दिसले. ब्लू सूटमध्ये शाहिद तर डिझायनर अर्पिता मेहताच्या साडीत मीरा अतिशय सुंदर दिसली.
कंगना-सोनम-आलिया-अथिया पोहोचल्या
वेडिंग रिसेप्शनमध्ये कंगना रनोट व्हाइट साडी, शॉर्ट हेअरस्टाइल आणि रेड लिपस्टिकमध्ये दिसली. तर सोनम कपूर बहीण रियासोबत पार्टीत दाखल झाली. कपूर सिस्टर्स यावेळी अनामिका खन्नाच्या डिझायनर आउटफिटमध्ये दिसल्या. अभिनेत्री अथिया शेट्टीने डिझायनर रोहित बलने डिझाइन केलेला लेहेंगा कॅरी केला होता. तर आलिया भट अबु जानी आणि संदीप खोसलाच्या डिझायनर आउटफिटमध्ये दिसली. दीया मिर्झा, नेहा धुपिया, जितेंद्र, रितेश देशमुख, अदिती राव हैदरी, दिग्दर्शक विकास बहल, निर्माता सुनील आणि कृषिका लुल्ला, अंशुला कपूर, विवेक ओबरॉय, मंदिरा बेदी हे सेलेब्स पार्टीत सहभागी झाले होते.
अनामिका खन्नाने डिझाइन केला नववधूसाठी ड्रेस
रिसेप्शन पार्टीत नववधू मसाबा गुप्ता डिझायनर अनामिका खन्नाच्या आउटफिटमध्ये दिसली. ती ऑफ व्हाइट अँड ब्लॅक लहेंग्यात दिसली. मसाचा नवरा आणि निर्माता मधू मंतेना ब्लॅक शेरवानीत दिसला. जून महिन्यात मसाबा आणि मधू यांनी कोर्ट मॅरेज केले होते. त्यानंतर 21 नोव्हेंबर रोजी मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये संगीत सेरेमनी आणि 22 नोव्हेंबर रोजी वेडिंग रिसेप्शनचे आयोजन केले होते.
पुढील स्लाईड्समध्ये, मसाबा-मधूच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये पोहोचलेल्या स्टार्सची खास झलक...