आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'तमाशा'च्या स्पेशल स्क्रिनिंगला EX बॉयफ्रेंड आणि आईवडिलांसोबत पोहोचली दीपिका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडे - (वर) रणवीर सिंग, (खाली) दीपिका पदुकोण, उजवीकडे (वर) - दीपिकाचे आईवडील, (खाली) रणबीर कपूर - Divya Marathi
डावीकडे - (वर) रणवीर सिंग, (खाली) दीपिका पदुकोण, उजवीकडे (वर) - दीपिकाचे आईवडील, (खाली) रणबीर कपूर

मुंबईतील यशराज स्टुडिओत बुधवारी रात्री इम्तियाज अलींच्या आगामी 'तमाशा' या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. यावेळी दीपिका पदुकोण तिचा सध्याचा बॉयफ्रेंड रणवीर सिंह आणि आणि पुर्वाश्रमीचा बॉयफ्रेंडसोबत रणबीर कपूरसोबत दिसली. या तिन्ही स्टार्सना थिएटरबाहेर पडताना कॅमे-यात क्लिक करण्यात आले.
विशेष म्हणजे स्क्रिनिंगला दीपिकाचे आईवडीलसुद्धा पोहोचले होते. याशिवाय दिग्दर्शक इम्तियाज अली, निर्माता साजिद नाडियाडवाला. गायिका अलका याज्ञिक, सुनिधी चौहानसह अनेक सेलेब्सनी तमाशा पाहिला.
रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण स्टारर 'तमाशा' हा रोमँटिक धाटणीचा सिनेमा येत्या 27 नोव्हेंबर रोजी रिलीज होतोय. यापूर्वी ही जोडी 'बचना ए हसीनों' आणि 'ये जवानी है दीवानी' या सिनेमांमध्ये एकत्र झळकली आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'तमाशा'च्या स्क्रिनिंगला पोहोचलेल्या स्टार्सची छायाचित्रे...