आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झहीर-सागरिकाच्या साखरपुड्याला हातात हात घालून पोहोचले Love Birds अनुष्का-विराट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विराट कोहली-अनुष्का शर्मा आणि सागरिका घाटगे-झहीर खान - Divya Marathi
विराट कोहली-अनुष्का शर्मा आणि सागरिका घाटगे-झहीर खान
23 मे रोजी मुंबईतील एका पंचातारांकित हॉटेलमध्ये अभिनेत्री सागरिका घाटगे आणि क्रिकेटपटू झहीर खान यांचा साखरपुडा झाला. दोघांना शुभेच्छा द्यायला बॉलिवूड इंडस्ट्री आणि क्रिकेटजगतातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. या सर्व सेलिब्रिटींमध्ये लक्ष वेधून घेतले ते विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी... विराट आणि अनुष्का रिलेशनशिपमध्ये असल्याचे जगजाहिर आहे. या दोघांनीही त्यांचे नाते जगापासून लपवून ठेवलेले नाही.
 
सागरिका आणि झहीर यांना शुभेच्छा द्यायला हे लव्ह बर्ड्स हातात हात घालून कार्यक्रमस्थळी दाखल झाले. एकाच गाडीतून हे दोघे पोहोचले होते. दोघे एकत्र दिसताच कॅमे-याच्या नजरा दोघांकडे वळल्या. दोघांनीही फोटोग्राफर्सना त्यांचे फोटो क्लिक करु दिले. यावेळी अनुष्का ब्लॅक आउटफिटमध्ये तर विराट व्हाइट शर्टमध्ये दिसला.   PICS: सागरिका-झहीरचा झाला साखरपुडा, सचिनसह पोहोचले बॉलिवूड सेलेब्स आणि क्रिकेटपटू
 
 
हे सेलेब्सही पोहोचले एन्गेजमेंटला...
अनुष्का आणि विराट यांच्यासह अजय जडेजा, गौरव कपूर, पुर्णा पटेल, अजिंक्य राहाणे, रवीना टंडन आणि तिचे पती अनिल थडानी, युवराज सिंह, बॉबी देओलसह अनेक सेलेब्स सागरिका-झहीरच्या साखरपुड्याला आवर्जुन उपस्थि होते. 

पुढील स्लाईड्सवर बघा, झहीर-सागरिकाच्या साखरपुड्याला पोहोचलेल्या सेलेब्सचे खास फोटोज...   
बातम्या आणखी आहेत...