आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Celebs Attend Director Sajid Khan Birthday Party

पार्टीत बहीण-भावोजीसोबत पोहोचला अभिषेक, सैफ-रितेश-अक्षय झाले SPOT

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिषेक बच्चन, नैना बच्चन, कुणाल कपूर, रितेश देशमुख, सैफ अली खान
मुंबईच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये दिग्दर्शक साजिद खानच्या बर्थडे पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. साजिद खानच्या 44व्या बर्थडे निमित्त ही पार्टी त्याचा जवळचा मित्र आणि निर्माता साजिद नाडियाडवालाने ठेवली होती.
बहीण-भावोजीसोबत पोहोचला अभिषेक-
साजिदच्या बर्थडे पार्टीत अभिनेता अभिषेक बच्चन त्याला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचला होता. अभिषेकची चुलत बहीण नैना बच्चन आणि त्याचा भावोजी कुणाल कपूरसुध्दा या पार्टीत उपस्थित होते. अभिषेक यावेळी व्हाइट कुर्ता पायजामा आणि लाइट ब्लू नेहरू जॅकेटमध्ये दिसला. तसेच नैना व्हाइट टॉप आणि ब्लॅक फुल लेंथ स्कर्टमध्ये स्पॉट झाली. तसेच कुणालने ब्लॅक टी-शर्ट आणि डेनिम्स कॅरी केलेली होती.
अक्षय-सैफ-रितेश झाले स्पॉट-
'हाउसफुल' सीरिजमध्ये एकत्र काम केलेले अक्षय कुमार आणि रितेश देशमुख पार्टीमध्ये सामील झाले होते. सैफ अली खान, रणधीर कपूर, सोनाली बेंद्रे, झरीन खान, तमन्ना भाटीया, बोमन ईरानी, चंकी पांडे, फराह खान, शिरीष कुंदरसह टीव्ही अभिनेता गुरमीत चौधरीनेसुध्दा पार्टी एन्जॉय केली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा दिग्दर्शक साजिद खानच्या बर्थडे पार्टीमध्ये सामील झालेल्या स्टार्सचे फोटो...