आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'अलीगढ'च्या स्क्रिनिंगवेळी मनोज वाजपेयी म्हणाला, 'अवॉर्ड्स महत्वाचे नाहीत'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडून ईशा गुप्ता, उजवीकडे रत्ना पाठक शाह, नसीरुद्दीन शाह आणि मनोज वाजपेयी - Divya Marathi
डावीकडून ईशा गुप्ता, उजवीकडे रत्ना पाठक शाह, नसीरुद्दीन शाह आणि मनोज वाजपेयी
मुंबई- मंगळवारी (16 फेब्रुवारी) मुंबईमध्ये दिग्दर्शक हंसल मेहताच्या 'अलीगढ' सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग झाले. यावेळी सिनेमाचा मुख्य कलाकार मनोज वाजपेयी मीडियासोबत बातचीत करताना म्हणाला, की त्याला बॉलिवूड अवॉर्ड्सवर विश्वास नाहीये. कारण या अवॉर्ड्सचा फॉर्मेट ठरलेला असतो. म्हणून तो केवळ आपल्या कामावर आणि प्रेक्षकांच्या प्रेमावर विश्वास ठेवतो.
अनेक सेलेब्स पोहोचले...
या स्क्रिनिंगला सिनेमाच्या मुख्य कलाकारांसोबतच नसीरुद्दीन शाह, रत्ना पाठक शाह, केतन मेहता, अमित साध, ईशा गुप्ता, पल्लवी शारदा, सुधीर मिश्रा, दीपा साही, रोहित रॉय, मानसी जोशी, राहुल भट्ट आणि पूजा बेदीसह अनेक सेलेब्स पोहोचले होते.
सर्वांनी केली सिनेमाची प्रशंसा...
स्क्रिनिंगमध्ये पोहोचलेल्या सर्व स्टार्सनी सिनेमाची प्रशंसा केली. नसीरुद्दीन शाह यांनी मनोज वाजपेयी आणि राजकुमार रावला नवीन पिढीचे सर्वात टॅलेंटेड अभिनेते म्हटले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा स्क्रिनिंगला पोहोचलेल्या इतर सेलेब्सचे फोटो...