आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: करणच्या पार्टीत गर्लफ्रेंडसोबत पोहोचले सिद्धार्थ-वरुण, हे सेलेब्सही दिसले जोडीदारासोबत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता करण जोहरच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्या घरी अवघे तारांगण अवतरले होते. गुरुवारी करणने त्याच्या 45 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक ग्रँड पार्टी होस्ट केली. या पार्टीत अनेक सेलिब्रिटी आपल्या जोडीदारासोबत पोहोचले.
 
गर्लफ्रेंडसोबत पोहोचले सिद्धार्थ आणि वरुण धवन...
करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इयर' या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण करणारी जोडी म्हणजे सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट. खासगी आयुष्यात हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. करणच्या बर्थडे पार्टीत ही जोडी  एकत्र पोहोचली. शिवाय आलिया-सिद्धार्थ यांच्यासोबत सिनेसृष्टीत पदार्पण करणारा अभिनेता वरुण धवनसुद्धा त्याची गर्लफ्रेंड नताशासोबत पार्टीत दिसला.  तर अभिनेता टायगर श्रॉफसुद्धा त्याची गर्लफ्रेंड दिशा पाटनीसोबत पार्टीत पोहोचला. 
 
हे सेलिब्रिटी कपल पोहोचले... 
अभिनेता अक्षय कुमार पत्नी ट्विंकलसोबत पार्टीत दाखल झाला. तर ऐश्वर्या-अभिषेक बच्चन, संजय दत्त आणि मान्यता दत्त, सोनाली बेंद्रे आणि तिचे पती गोल्डी बहल, समीर सोनी आणि त्याची पत्नी नीलम हे या पार्टीत सहभागी झाले होते. तर 'ट्युबलाईट' या सिनेमाचे दिग्दर्शक कबीर बेदीसुद्धा त्यांच्या सिनेमाच्या ट्रेलर लाँच इव्हेंटनंतर पत्नी मिनी माथूरसोबत पार्टीत पोहोचले.  करणच्या बर्थडे पार्टीत अवतरले अवघे बॉलिवूड, पाहा ‘Mother of All Bashes’
 
 
पुढील स्लाईड्सवर तुम्हीही बघा, करणच्या पार्टीत जोडीने सहभागी झालेल्या या सेलिब्रिटी कपलची खास छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...