आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिराचा सिनेमा बघायला नव-यासोबत पोहोचली विद्या बालन, मावशीसोबत दिसली श्रद्धा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः गुरुवारी रात्री जुहूस्थित पीव्हीआरमध्ये आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर स्टारर 'ओके जानू' या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. यावेळी श्रद्धा कपूर तिची मावशी पद्मिनी कोल्हापुरे आणि वडील शक्ती कपूरसोबत स्क्रिनिंगस्थळी पोहोचली होती. तर अभिनेत्री विद्या बालनसुद्धा तिचे पती सिद्धार्थ रॉय कपूरसोबत आली होती. विद्याचा दीर आदित्य रॉय कपूर या सिनेमात मेन लीडमध्ये आहे. या सेलिब्रिटींसोबतच स्क्रिनिंगला जॅकी श्रॉफ, गोविंदा, शबाना आझमी, नोरा फतेही, करण जोहर, सैयामी खेर आणि अनू मलिकसह बरेच स्टार्स उपस्थित होते.

'आशिकी-2'नंतर आदित्य आणि श्रद्धाची जोडी पुन्हा एकत्र...
आशिकी-2 या सिनेमानंतर ओके जानू या सिनेमातून  आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूरची जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र आली आहे. सिनेमात या जोडीचा एक हटके आणि बोल्ड अंदाज बघायला मिळतोय.  हा सिनेमा मणिरत्नम यांच्या गाजलेल्या 'ओके कनमनी' या तामिळ सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. शाद अली यांनी सिनेमा दिग्दर्शित केला असून करण जोहर आणि मणिरत्नम निर्माते आहेत. आज (13 जानेवारी) सिनेमा बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आहे. 

पुढील स्लाईड्समध्ये बघा, सिनेमाच्या स्क्रिनिंगला पोहोचलेल्या बॉलिवूड सेलेब्सचे PHOTOS...