आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'XXX...\'च्या प्रीमिअरला रणवीरसोबत पोहोचली दीपिका, दिसले हे बॉलिवूड सेलेब्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः हॉलिवूड अॅक्टर विन डीजल गुरुवार सकाळी मुंबईत दाखल झाला. निमित्त आहे त्याच्या आगामी  'XXX: रिटर्न ऑफ जेंडर केज' या सिनेमाच्या प्रमोशनचे. या सिनेमात बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोणची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. दीपिकाचा हा पहिलाच बॉलिवूड सिनेमा आहे. गुरुवारी संध्याकाळी मुंबईतील लोअर परेलच्या पीव्हीआर येथे या सिनेमाचा शानदार प्रीमिअर सोहळा आयोजित करण्यात आला होता.
 
या प्रीमिअरला दीपिका तिचा बॉयफ्रेंड रणवीर सिंहसोबत पोहोचली. याशिवाय इरफान खान, रिचा चड्ढा, कल्कि कोचलिन, दिव्या खोसला, उर्वशी रौतेला, शाहिद कपूर, मधुर भंडारकर, नीतू चंद्रा आणि शबाना आझमीसह अनेक स्टार्स पोहोचले होते. प्रीमिअरला दीपिकाचे वडील प्रकाश पदुकोण यांनीही उपस्थिती लावली होती. हा सिनेमा येत्या 20 जानेवारी रोजी वर्ल्डवाइड रिलीज होणारेय. 
 
पुढील स्लाईड्समध्ये बघा, प्रीमिअरला क्लिक झालेली स्टार्सची खास छायाचित्रे...