मुंबई: येत्या 25 फेब्रुवारी रोजी अभिनेता शाहिद कपूर वयाची 36 वर्षे पूर्ण करणार आहेत. वाढदिवसाच्या आठवड्याभरापूर्वीच शाहिदची पत्नी मीरा राजपूत हिने त्याच्यासाठी खास पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. दीपिका पदुकोण, कतरिना कैफ, आलिया भट, सोनाक्षी सिन्हा, एकता कपूर यांना स्टायलिश आउटफिटमध्ये शाहिदच्या घराबाहेर क्लिक करण्यात आले. विशेष म्हणजे या पार्टीत अभिनेता वरुण धवन त्याची गर्लफ्रेंड नताशा दलालसोबत हातात हात घालून पोहोचला. तर आलिया भटसुद्धा तिचा बॉयफ्रेंड आणि अॅक्टर सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसली. यांच्याशिवाय फरहान अख्तर, डायरेक्टर विशाल भारद्वाज, प्रोड्यूसर साजिद नाडियाडवाला, करण जोहर शाहिदच्या पार्टीत पोहोचले बोते.
दिसले नाहीत सैफ-कंगना...
शाहिद स्टारर 'रंगून' हा सिनेमा येत्या 24 फेब्रुवारी रोजी रिलीज होतोय. या सिनेमात शाहिदसोबत सैफ अली खान आणि कंगना रनोट मेन लीडमध्ये आहेत. या पार्टीत शाहिदचे हे दोन को-स्टार्स मात्र दिसले नाहीत. पण सैफ अली खानची मुलगी सारा अली खान ब्लॅक अँड व्हाइट स्टायलिश आउटफिटमध्ये पार्टीत सहभागी झाली होती.
पुढील स्लाईड्समध्ये बघा, शाहिदच्या प्री-बर्थडे बॅशमध्ये सहभागी झालेल्या स्टार्सचे Photos...