(प्रतीकसोबत शबाना आजमी, अमिताभ बच्चन)
प्रसिध्द दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील हयात असत्या तर त्यांनी वयाची 60 वर्षे पूर्ण केली असती. त्यांच्या जयंतीनिमित्त लेखिका मैथिली रावने स्मिताची 'स्मिता पाटील: अ ब्रीफ इन्सीटेडन्स' बायोग्राफी लाँच केली. यावेळी सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. शबाना आझमी, जया बच्चन, सोनाली कुलकर्णी, नंदिता दास, गोविंद निहलानी, केतन मेहता आणि श्याम बेनेगलसारखे अनेक दिग्गजांसह स्मिता यांचा मुलगा प्रतिक, बहीण मान्या पाटील आणि वडील पती शिवाजी राव गिरधर पाटीलसुध्दा उपस्थित होते.
बुक लाँच करण्यासाठी स्मिता यांचा को-स्टार राहिलेले अमिताभ बच्चनसुध्दा येथे पोहोचले होते. यादरम्यान बिग बींनी स्मिता यांची प्रशंसा करताना सांगितले, 'जेव्हा मला स्मिताविषया बोलायचे असते, तेव्हा माझ्याकडे शब्द कमी पडतात.'
'नमक हराम' सिनेमाचील एक किस्सा सांगताना त्यांनी सांगितले, 'स्मिताला या सिनेमातील 'आज रपट जाये' गाणे मूळीच आवडत नव्हते. परंतु तिने सिनेमासाठी कमिटमेंट केलेली होती. म्हणून तिला नाइलाजाने गाणे चित्रीत करावे लागले. या गाण्याला ती आयुष्यातील लाजीरवाणी गोष्टी म्हणायची.'
स्मिता यांची को-स्टार आणि प्रतिस्पर्धी राहिलेली शबाना आझमीसुध्दा या इव्हेंटमध्ये पोहोचल्या होत्या. त्यांनीदेखील जून्या आठवणींना उजाळा दिला. त्या म्हणाल्या, त्या दोघी कधीच मैत्रीणी होऊ शकल्या नाही. त्यांच्या नेहमी स्पर्धा होती. मात्र आता त्यांना या गोष्टीचा पश्चाताप होतो.
स्मिताचे अनेक सिनेमे दिग्दर्शित केलेले श्माम बेनेगल यांनीसुध्दा त्यांना ट्रिब्यूट दिले आणि तिच्याशी निगडीत अनेक गोष्टी शेअर केल्या. अभिनेत्री नंदिता दास, जिची तुलने नेहमी स्मिता यांच्याशी केली जाते. त्यांनीसुध्दा स्मिता यांचा श्रध्दांजली वाहीली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा इव्हेंटमध्ये पोहोचलेल्या सेलेब्सचे PHOTOS...