Home »Party» Celebrities Attended Ganapati Party At Mukesh Ambani Residence

अंबानींच्या घरी गणरायाच्या दर्शनासाठी बिग बी, सल्लू, शाहरूखसह उद्धव ठाकरेंचीही उपस्थिती

दिव्य मराठी वेब टीम | Aug 26, 2017, 13:06 PM IST

  • अंबानींच्या घरी दर्शनासाठी आलेली विद्या बालन, सचिन तेंडुलकर, अंजली आणि अर्जुन तेंडुलकर आणि उद्धव ठाकरेंचे स्वागत करताना मुकेश अंबानी.
एंटरटेनमेंट डेस्क - सर्व भक्त ज्या गणरायाच्या स्वागतासाठी वर्षभर तयारी करत असतात त्यांची प्रतिक्षा संपली आहे. संपूर्ण देशभरात जल्लोषात बाप्पाचे आगमन झाले आहे. दरवर्षीप्रमाणेच उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरीही गणरायाचे आगमन झाले आहे. यंदाही मुकेश अंबानी यांच्या घरी बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी बॉलिवूडच्या आघाडीतच्या सर्व सेलिब्रिटींची गर्दी झाली होती. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचीही यावेळी उपस्थिती होती. त्याचबरोबर सचिन तेंडुलकर, बिग बी अमिताभ बच्चन, सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान, रणवीर-दीपिका, प्रियांका चोप्रा यांच्यासह बी टाऊनच्या सेलिब्रिटींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सर्वच सेलिब्रिटी पारंपरिक भारतीय पेहरावात याठिकाणी पोहोचले होते. चला तर मग पाहुयात मुकेश अंबानींच्या पार्टीमध्ये कसा होता सेलिब्रिटींचा अंदाज.

पुढील स्लाइड्सवर पाहा, मुकेश अंबानींच्या घरी गणरायाच्या दर्शनासाठी पोहोचलेल्या सेलिब्रिटींचे PHOTOS...

Next Article

Recommended