आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: मलायका-अरबाजने पाहिला 'बंगिस्तान', स्क्रिनिंगला पोहोचले अनेक स्टार्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईतील लाइटबॉक्स थिएटरमध्ये बुधवारी 'बंगिस्तान' या आगामी सिनेमाचे स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. या सिनेमात मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता पुलकित सम्राटने इंडस्ट्रीतील त्याच्या मित्रांसाठी हे स्क्रिनिंग आयोजित केले होते. यावेळी अभिनेता-निर्माता अरबाज खान पत्नी मलायका अरोरा खानसोबत आला होता. याशिवाय 'बंगिस्तान'मध्ये मुख्य भूमिका वठवणारी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससुद्धा येथे दिसली. यामी गौतम, उर्वशी रौतेला आणि दिग्दर्शक डेविड धवन थिएटरबाहेर पडताना दिसले.
करण अंशुमान दिग्दर्शित 'बंगिस्तान'मध्ये रितेश देशमुख आणि पुलकित सम्राट लीड रोलमध्ये आहे. दोघेही दहशतवाद्याच्या भूमिकेत सिनेमात दिसणार आहेत. उद्या म्हणजे 7 ऑगस्ट रोजी सिनेमा थिएटरमध्ये दाखल होतोय.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, स्क्रिनिंगला पोहोचलेल्या स्टार्सचे फोटोज...