आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणबीर-कतरिनाने पाहिला \'ब्रदर्स\', स्क्रिनिंगला सलमानचे आई-वडीलसुध्दा पोहोचले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(कतरिना कैफ, रणबीर कपूर, सलीम खान आणि हेलन)
गुरुवारी (13 ऑगस्ट) मुंबईच्या लाइटबॉक्स थिएटरमध्ये सिध्दार्थ मल्होत्राने 'ब्रदर्स' सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग आयोजत केले होते. स्क्रिनिंगवेळी अभिनेता रणबीर कपूर गर्लफ्रेंड कतरिना कैफसोबत पोहोचला होता. कतरिनाने यावेळी डिझाइनर प्रबल गुरुंगचा ड्रेस परिधान केलेला होता. तसेच रणबीर कपूर ब्लू टी-शर्ट आणि डेनिम्समध्ये दिसला. या जोडीशिवाय सलमान खानचे आई-वडील सलीम खान आणि हेलनसुध्दा थिएटरच्या बाहेर पडताना दिसले. आलिया भट्ट, दिग्दर्शक अयान मुखर्जी, दिग्दर्शक विकास बहल, प्रेम चोप्रा, सिध्दार्थ मल्होत्राचा भाऊ हर्षद मल्होत्रासुध्दा स्क्रिनिंगला पोहोचला होता.
फॅमिलीसोबत सोनाक्षीने पाहिला 'ब्रदर्स'
मुंबईच्या सनी सुपर साऊंडमध्येसुध्दा 'ब्रदर्स'चे स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. यावेळी सोनाक्षी सिन्हा वडील शत्रुघ्न सिन्हा आणि आई पूनम सिन्हा यांच्यासोबत स्क्रिनिंगला पोहोचली होती. 'ब्रदर्स'मध्ये मुख्य भूमिका साकारणा-या अक्षय कुमारचा मुलगा आरव कुमार आणि आई अरुना भाटियासुध्दा यावेळी स्पॉट झाले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'ब्रदर्स'च्या स्क्रिनिंगला पोहोचलेल्या सेलेब्सची खास झलक...