आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: 'गुड्डू रंगीला'च्या प्रीमिअरला ग्लॅमरस अंदाजात पोहोचले अनेक सेलेब्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(हुमा कुरैशी, आदिती राव हैदरी, रूही सिंह, किरण राव)
मुंबईः गुरूवारी संध्याकाळी मुंबईतील एका थिएटरमध्ये 'गुड्डू रंगीला' या सिनेमाचा प्रीमिअर ठेवण्यात आला होता. प्रीमिअरच्या रेड कार्पेटवर बी टाऊनचे अनेक स्टार्स ग्लॅमरस अंदाजात दिसले. हुमा कुरैशी, आदिती राव हैदरी, रुही सिंह, किरण राव यांनी रेड कार्पेटवर आपला जलवा दाखवला.
'गुड्डू रंगीला' या सिनेमातील लीड अॅक्ट्रेस आदिती राव हैदरी येथे ब्लॅक टॉपशॉप जंपसूटमध्ये दिसली. तर कॅलेंडर गर्ल्स या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पणास सज्ज झालेली रुही सिंह डिझायनर हेमंत आणि नंदिता यांच्या मॅक्सी गाऊनमध्ये दिसली. हुमा कुरैशी आणि किरण राव ब्लू आउटफिटमध्ये कॅमे-यात क्लिक झाल्या.
रेड कार्पेटवर सिनेमातील लीड स्टार्स अर्शद वारसी, अमित साध आणि आदिती राव हैदरी यांच्यासह भूमी पेडणेकर, अमृता राव, शबाना आझमी, जावेद अख्तर, तुषार कपूर, सोनू सूद, दिग्दर्शक कबीर खान हे सेलेब्स कॅमे-यात क्लिक झाले.
'जॉली एलएलबी' या सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे दिग्दर्शक सुभाष घई यांचा हा सिनेमा आज (3 जुलै) थिएटरमध्ये दाखल झाला आहे.
पुढे पाहा, 'गुड्डू रंगीला'च्या प्रीमिअरला पोहोचलेल्या स्टार्सची खास झलक...