Home »Party» Celebs At Jitesh Pillais Birthday Party

दीर्घ काळानंतर एखाद्या इव्हेंटमध्ये पोहोचली उर्मिला, शिल्पा-रेखा यांचीही उपस्थिती

दिव्य मराठी वेब टीम | Jul 24, 2017, 12:24 PM IST

  • उर्मिला मातोंडकर, शिल्पा शेट्टी आणि रेखा
मुंबईः पत्रकार जितेश पिल्लई यांनी रविवारी त्यांच्या बर्थडे पार्टीचे आयोजन केले होते. या बर्थडे बॅशमध्ये बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर दीर्घ काळानंतर एखाद्या इव्हेंटमध्ये उपस्थिती लावताना दिसली. लाइट पिंक कलरच्या शॉर्ट ड्रेसमध्ये उर्मिला सुंदर दिसली. याच पार्टीत अभिनेत्री रेखा यांनीही उपस्थिती लावली होती. ब्लॅक कलरची कांजीवरम साडी, केसात माळलेला गजरा आणि डार्क रेड लिपस्टिकमध्ये रेखा नेहमीप्रमाणेच आकर्षक दिसल्या.
शिल्पा शेट्टी व्हाइट कलरच्या शॉर्ट ड्रेसमध्ये आणि कृती सेनन, अनुष्का शर्मा फ्लोरल प्रिंटच्या आउटफिटमध्ये दिसल्या. पार्टीत आलिया भट करण जोहरसोबत पोहोचली होती. झोया अख्तर, जॅकी श्रॉफ, डायना पेंटी, तुषार कपूर, सूरज पंचोली, शाहिद कपूर, डिझायनर मनीष मल्होत्रा, संजय सूरी, हर्षवर्धन कपूरसह अनेक सेलेब्स या बर्थडे बॅशमध्ये सहभागी झाले होते.
पुढे बघा, बर्थडे बॅशचे फोटोज...

Next Article

Recommended