आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाँचिंग अर्ध्यावर सोडून निघून गेले ऋषी, मस्तीच्या मूडमध्ये दिसले आलिया-सिद्धार्थ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिद्धार्थ मल्होत्रा, आलिया भट, ऋषी कपूर - Divya Marathi
सिद्धार्थ मल्होत्रा, आलिया भट, ऋषी कपूर

एन्टरटेन्मेंट डेस्कः आलिया भट, सिद्धार्थ मल्होत्रा आणि फवाद खान या स्टार्सनी बुधवारी त्यांच्या आगामी सिनेमा 'कपूर अँड सन्स'चा ट्रेलर लाँच केला. यावेळी 'लव्ह बर्ड्स' आलिया आणि सिद्धार्थ मस्तीच्या मूडमध्ये दिसले. करण जोहर, दिग्दर्शक शकुन बत्रा, रत्ना पाठक आणि रजत कपूर येथे उपस्थित होते. ट्रेलर लाँच अर्ध्यावर सोडून निघून गेले ऋषी...

सिनेमात आजोबांची व्यक्तिरेखा साकारणारे अभिनेते ऋषी कपूर हा इव्हेंट अर्ध्यावरच सोडून तेथून निघून गेले. ट्रेलर अनवील होईपर्यंत ते हजर राहिले. मात्र मीडियाशी बोलण्याआधी ते निघून गेले. त्यांना काही कारणास्तव लगेचच जावे लागले, असे करण जोहरने सांगितले. मात्र रिपोर्ट्सनुसार, रणबीर-कतरिनाच्या ब्रेकअपच्या प्रश्नांना टाळण्यासाठी त्यांनी तेथून जाणे पसंत केले, असे म्हटले जाते. 'कपूर अँड सन्स' हा सिनेमा येत्या 18 मार्च रोजी बॉक्स ऑफिसवर दाखल होतोय.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, इव्हेंटशी निगडीत स्टार्सची छायाचित्रे...