आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करीनाच्या पार्टीत गर्लफ्रेंड कतरिनासोबत पोहोचला रणबीर, दिसले अनेक सेलेब्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(करीनाच्या पार्टीमध्ये कतरिना कैफस रणबीर कपूर, रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख)
मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर आणि तिचा पती सैफ अली खानने शनिवारी (25 जुलै) स्वत:च्या घरी एक पार्टी आयोजित केली होती. करीनाचा कजिन रणबीर कपूर गर्लफ्रेंड कतरिनासह या पार्टीत पोहोचला होता. शिवाय अर्जुन कपूर, रितेश देशमुख त्याची पत्नी जेनेलिया देशमुख, सैफची बहीण सोहा अली खान आणि भावोजी कुणाल खेमूसह अनेक सेलिब्रेटी या पार्टीत पोहोचले होते.
सैफ-करीनाच्या या सेलिब्रेशनचे कारण करीनाचा अलीकडेच रिलीज झालेल्या 'बजरंगी भाईजान' सिनेमाचे यश होते. कबीर खानच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या सिनेमाची समीक्षक तसेच प्रेक्षकांकडूनदेखील मोठी प्रशंसा होत आहे. बॉक्स ऑफिसवर (भारतात) सिनेमाने 217 कोटींचा व्यवसाय केला आहे.
वर्ल्डवाइड कमाईच्या बाबतीत सिनेमा 300 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. तसेच सैफच्या 'फँटम' या आगामी सिनेमाचा शनिवारी ट्रेलर रिलीज झाला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा करीनाच्या पार्टीत पोहोचलेल्या सेलेब्सचे काही फोटो...