आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

In Pics: नील-रुक्मिणीच्या ग्रॅण्ड रिसेप्शन पार्टीचा थाट, बिग बी-रेखासह पोहोचले हे दिग्गज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईत शनिवारी रात्री नील नितिन मुकेश आणि रुक्मिणी यांचे वेडिंग रिसेप्शन पार पडले. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हे वेडिंग रिसेप्शन आयोजित करण्यात आले होते.  या ग्रॅण्ड पार्टीची थीम युरोपियन स्टाइल बेस्ड होती. व्हाइट आणि पिंक कलरच्या फुलांची सजावट येथे करण्यात अली होती. 

या सेलिब्रिटींची होती हजेरी...
नवदाम्पत्याला शुभाशिर्वाद देण्यासाठी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन पत्नी जया आणि मुलगा अभिषेकसोबत पोहोचले होते. याशिवाय कबीर बेदी-परवीन दुसांज, जॅकी श्रॉफ, भरत शाह, कविता कृष्णमुर्ती, अनुराधा पौडवाल, सूरज बडजात्या, कतरिना कैफ, सलमान खान आणि त्याची गर्लफ्रेंड युलिया वंतूर, रणधीर कपूर आणि त्यांच्या मातोश्री कृष्णा राज कपूर, बिपाशा बसू-करण सिंह ग्रोवर, अनुप जलोटा, असरानी, नीतु चंद्रा, हनी इराणी, कनिका कपूर, आफताब शिवदासानी-नीन दुसांज, पुजा हेगडे, मधुर भंडारकर, अब्बास मस्तान, संजय खान, जाऐद खान-मलायका खान, मुग्धा गोडसे, डिनो मोरिया, एवलिन शर्मा, श्रिया सरन, अनुष्का-आकांक्षा रंजन, तुषार कपूरसह अनेक सेलिब्रिटी पार्टीत पोहोचले होते. 

ग्रीन आऊटफिटमध्ये अतिशय क्यूट दिसले नवविवाहित दाम्पत्य..  
रिसेप्शनला नील आणि त्याची पत्नी रुक्मिणी यांनी डिझायनर मानव गंगवानी यांनी डिझाइन केलेले एमेराल्ड ग्रीन कलरचे आउटफिट परिधान केले होते. नीलने जोधपुरी स्टाईलचा ग्रीन कलरच्या कुर्त्यासोबत व्हाइट ट्राऊजर कॅरी केले होते. तर रुक्मिणीने एमेराल्ड ग्रीन कलरचा हेवी लहेंगा परिधान केला होता. 
 
9 फेब्रुवारीला जयपूरमध्ये रंगला होता शाही विवाहसोहळा...
बुधवारी 8 फेब्रुवारी रोजी उदयपूरमध्ये नील आणि रुक्मिणीची संगीत आणि मेंदी सेरेमनी झाली. त्यानंतर 9 फेब्रुवारी रोजी हळदी आणि सप्तपदी झाल्या. या लग्नात 500 गेस्ट सहभागी झाले होते. नीलच्या या ग्रॅण्ड लग्नात हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी झाली होती. शिवाय लग्नाची वरात खास विंटेज गाड्यांमधून लग्नमंडपात पोहोचली.
 
नील-रुक्मिणीचे अरेंज मॅरेज
34 वर्षीय नील आणि 27 वर्षीय रुक्मिणी यांचे अरेंज मॅरेज असून दोन्ही कुटुंबिय एकमेकांना खूप चांगल्या प्रकारे ओळखतात. गेल्यावर्षी दस-याच्या शुभमुहूर्तावर झालेल्या या साखरपुड्याला नील व रुक्मिणीचे कुटुंबीय आणि खास मित्रपरिवार उपस्थित होता.
 
कोण आहे रुक्मिणी सहाय...
रुक्मिणी नॉन फिल्मी बॅकग्राऊंडमधून आहे. तिचे शिक्षण मुंबईतील लीलावती बाई पोदार हायस्कूलमधून झाले आहे. सध्या ती ACASS रिक्रूटमेंट कंपनीत काम करते.
 
या फिल्म्समध्ये दिसला नील...
'जॉनी गद्दार', 'न्यूयॉर्क', 'सात खून माफ', 'वझीर', 'प्रेम रतन धन पायो' यांसह अनेक सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची चुणुक दाखवली आहे.
 
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, नील आणि रुक्मिणीच्या ग्रॅण्ड रिसेप्शन पार्टीत पोहोचलेल्या सेलिब्रिटींची खास झलक...
बातम्या आणखी आहेत...