आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फॅमिली फ्रेंड्ससोबत बर्थडे साजरा करत होती सलमानची बहीण, पोलिसांनी थांबवली पार्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(श्रध्दा कपूर, अर्जुन कपूर, सोनाक्षी सिन्हा सोहेल खान, रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख)
मुंबई- सलमान खानची धाकटी बहीण अर्पिता खानने शनिवारी (1 ऑगस्ट) आपला 26वा वाढदिवस साजरा करत आहे. काल अर्थातच शुक्रवारी (31 जुलै) गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये अर्पिताची बर्थडे पार्टी आयोजित करण्यात आली होती. पार्टीमध्ये अभिनेत्री श्रध्दा कपूर, सोनाक्षी सिन्हा, रितेश देशमुख, जेनेलिया देशमुखसह अर्पिताचा एक्स बॉयफ्रेंड अभिनेता अर्जुन कपूरसुध्दा तिला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचला होता. मात्र या पार्टीत पोलिसांना दाखल द्यावी लागली. कारण रात्री 10च्या नंतर लाऊड स्पीकर बंद करणे आवश्यक होते. परंतु रात्री उशीरापर्यंत लाऊड स्पीकर चालू होते. म्हणून पोलिसांनी येऊन पार्टी थांबवली.
पार्टीनंतर सलमान खानचे संपूर्ण कुटुंबीय माध्यमांसमोर आले. यादरम्यान सलीम खान, सोहेल खान, हेलन, अर्पिता खान, आयुष शर्मा, एलिजा अग्नीहोत्री (सलमानची भाची) फोटोग्राफर्सच्या कॅमे-यात कैद झाले. पार्टीत सलमानच्या जवळचे मित्र बाबा सिद्दीकी, दिग्दर्शक कबीर खान, करिश्मा कपूर, इमरान खान, मलायका अरोरा खान, एली अवरामसह अनेक सेलेब्स उपस्थित होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अर्पिताच्या बर्थडे पार्टीत पोहोचलेल्या सेलेब्सची खास झलक...