आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Celebs At The Launching Of Welcome Back Title Track

\'वेलकम बॅक\'चे टायटल ट्रॅक लाँच, इव्हेंटमध्ये थिरकले अनिल-जॉन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(साँग लाँचिंगवेळी गायिका गिता झल्ला, अनिल कपूर आणि जॉन अब्राहम)
मुंबई- मुंबईमध्ये 'वेलकम बॅक' या आगामी सिनेमाचे टायटल साँग लाँच करण्यात आले. यानिमित्तावर सिनेमातील कलाकार अनिल कपूर आणि जॉन अब्राहम डान्स करताना दिसले. जॉन आणि अनिल अभिनेता नाना पाटेकर, दिग्दर्शक अनीस बज्मी, कोरिओग्राफर गणेश आचार्य, गायक मीका सिंह आणि गीता झल्लासुध्दा स्टेजवर उपस्थित होते. मीका आणि गीताने सिनेमाच्या टायटल ट्रॅकला आवाज दिला आहे.
हा सिनेमा 2007मध्ये आलेल्या 'वेलकम'चे सीक्वेल आहे. 'वेलकम'मध्ये अक्षय कुमार आणि कतरिना कैफ महत्वाच्या भूमिकेत आहेत. सीक्वेलमध्ये अक्षयऐवजी जॉन आणि कतरिनाऐवजी श्रुती हसन दिसणार आहे. नसीरुद्दीन शाहनेसुध्दा सिनेमात खास भूमिका साकारली आहे. सिनेमा पुढील महिन्याच्या 4 तारखेला रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा साँग लाँचिंगदरम्यान उपस्थित सेलेब्सची खास झलक...