मुंबईः शुक्रवारी पार पडलेल्या स्टार स्क्रीन अवॉर्ड्समध्ये
अमिताभ बच्चन, जया बच्चन, अक्षय कुमार, रणवीर सिंह, दीपिका पदुकोण, जॅकलिन फर्नांडिस, सोनाक्षी सिन्हा, करण जोहर, सोनम कपूर, वरुण धवन आणि श्रद्धा कपूरसह अनेक बॉलिवूड सेलेब्स रेड कार्पेटवर अवतरले होते.
अमिताभ बच्चन यांच्या प्रश्नावर इरफान खानने दिले विचित्र रिअॅक्शन...
सोहळ्यात जेव्हा पत्रकारांनी इरफान खानला अमिताभ बच्चन यांना इन्क्रेडिबल इंडियाचे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर करण्याविषयी विचार सुरु असून याविषयी तुझे मत काय? हा प्रश्न विचारला असता त्याने विचित्र रिअॅक्शन देताना म्हटले, ''अरे कुठे, मला काय करायचे आहे... जे होतंय ते होऊ द्या, चांगली गोष्ट आहे.''
मग म्हणाला - मी आताच झेलला आहे हा प्रश्न
हाच प्रश्न अक्षय कुमारला विचारला असताना इरफान तिथे हजर होता. प्रश्न ऐकल्यानंतर इरफान म्हणाला, मी आत्ताच हा प्रश्न झेलला आहे... आणि असे म्हणून तेथून निघून गेला. अक्षयने मात्र बिग बींना इन्क्रेडिबल इंडियासाठी बेस्ट पर्सन असल्याचे म्हटले.
पुढे पाहा, रेड कार्पेटवर अवतरलेल्या स्टार्सची छायाचित्रे...