आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Celebs At The Screening Of \'Hamari Adhuri Kahan

Pics : विक्रम भट्टने मुलीसोबत पाहिला \'हमारी अधूरी कहानी\' सिनेमा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईत शनिवारी अपकमिंग सिनेमा 'हमारी अधूरी कहानी'चा शो आयोजित करण्यात आला होता. या दरम्यान डायरेक्टर विक्रम भट्ट मुलगी कृष्ण भट्टसोबत दिसले. याव्यतिरिक्त विद्या बालन, इम्रान हश्मी, मोहित सुरी, विशेष भट्ट, राहुल रॉय, पूजा भट्ट, मुकेश भट्ट, श्रीसंत आणि त्यांची पत्नी भुवनेश्वरी, ऋचा चढ्ढा आणि गुलशन देवैयासहित इतर सेलेब्स उपस्थित होते.

या सर्वांमध्ये आकर्षणाचे केंद्र ठरली 90 च्या दशकातील पूजा भट्ट आणि राहुल रॉय यांची जोडी. दोघांमध्ये चांगली केमेस्ट्री दिसून आली. 90 च्या दशकात पूजा आणि राहुलने 'फिर तेरी कहानी याद आई', 'जुनून' आणि 'जानम' या सिनेमांमध्ये एकत्र काम केले आहे.

12 जूनला रिलीज होणार सिनेमा
डायरेक्टर मोहित सुरीच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या सिनेमात इम्रान हाश्मी, विद्या बालन आणि राजकुमार राव प्रमुख भूमिकेत आहेत. हा सिनेमा महेश भट्ट आणि मुकेश भट्ट यांनी प्रोड्यूस केला आहे. या महिन्यात 12 तारखेला हा सिनेमा रिलीज होणार आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा, स्क्रीनिंगसाठी पोहोचलेल्या सेलेब्सचे काही खास फोटो...