आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : 'ब्रदर्स'च्या ट्रेलर लाँचिंग इव्हेंटमध्ये या अंदाजात दिसले स्टार्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडे - करण जोहर, जॅकलिन फर्नांडिस आणि अक्षय कुमार)
मुंबईः दिग्दर्शक करण मल्होत्राच्या आगामी 'ब्रदर्स' या सिनेमाचा ट्रेलर बुधवारी रिलीज करण्यात आला. यावेळी अक्षय कुमार, जॅकलिन फर्नांडिस, जॅकी श्रॉफ आणि सिद्धार्थ मल्होत्रासह सिनेमाची संपूर्ण स्टारकास्ट ट्रेलर लाँचिंग इव्हेंटमध्ये उपस्थित होती. सिनेमात सख्या भावांची भूमिका साकारणारा अक्षय कुमार आणि सिद्धार्थ मल्होत्राची बॉडिंग इव्हेंटमध्येही अगदी सख्या भावांप्रमाणे दिसली.
दोघांनीही जॅकलिन आणि सिनेमाच्या टीमसोबत भरपूर धमालमस्ती केली. सिनेमात अक्षयने डेविड फर्नांडिस आणि सिद्धार्थने त्याचा धाकटा भाऊ मोंटी फर्नांडिसची भूमिका वठवली आहे. हे दोघेही फायटर्स असतात. मात्र एक अशी परिस्थिती निर्माण होते, ज्यामुळे हे दोघे रिंगमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकतात. सिनेमात जॅकी श्रॉफ आणि आशुतोष राणा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. यावर्षी 14 ऑगस्टला सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाखल होतोय.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'ब्रदर्स'च्या ट्रेलर लाँचिंग इव्हेंटमध्ये क्लिक झालेली खास छायाचित्रे...