आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Vogue Awards: ग्लॅमरस लूकमध्ये दिसल्या अनुष्का आणि अथिया, अनेक सेलेब्स झाले Spot

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अनुष्का शर्मा, नेहा धुपिया, अथिया शेट्टीसह बी टाऊनच्या अभिनेत्रींची मांदियाळी मुंबईतील हॉटेल पॅलेडियम येथे जमली होती. निमित्त होते सहाव्या व्होग ब्युटी अवॉर्ड्स सोहळ्याचे. राणी मुखर्जी, निर्मत कौर, सोफी चौधरी, तारा शर्मा, तनिषा मुखर्जी, कियारा आडवाणी या अभिनेत्रींनीसुद्धा आपल्या उपस्थितीने सोहळ्याला चारचाँद लावले. अभिनेत्रीच नव्हे तर फवाद खान, डीनो मोरिया, जॅकी भगनानी, क्रिकेटपटू विराट कोहली या सेलिब्रिटींनीही सोहळ्याला आवर्जुन हजेरी लावली होती.

विराटसोबत पोहोचली अनुष्का शर्मा
इव्हेंटमध्ये आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली ती अनुष्का आणि विराट कोहलीची जोडी. दोघेही हातात हात घालून फंक्शनमध्ये दाखल झाले. यावेळी अनुष्काला या सोहळ्यात बेस्ट फेस या अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. अनुष्काने डिझायनर गौरी आणि नैनिका यांचा पेल येलो हॉल्टर नेक गाऊन कॅरी केली होती.
अथिया शेट्टी इन येलो
अनुष्का प्रमाणेच सुनील शेट्टीची मुलगी अथिया हिनेसुद्धा डिझायनर गौरी आणि नैनिकाच्या आउटफिटची निवड केली. तिने आपल्या लूकला सिंपल हेअरस्टाइल, इअरिंग्स आणि गोल्डन क्लचने पूर्ण केले.

ब्लू लूकमध्ये नेहा धुपिया
व्होग अवॉर्ड्सच्या सहाव्या एडिशनची होस्ट नेहा धुपिया हिने इव्हेंटमध्ये गौरी आणि नैनिका यांच्या कलेक्शनमधील ब्लू गाऊनची निवड केली.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, व्होग ब्युटी अवॉर्ड्समध्ये पोहोचलेल्या सेलेब्सची छायाचित्रे...