आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'वेलकम बॅक'च्या ट्रेलर लाँचवेळी फनी मूड दिसले नाना, स्टार्ससोबत केले एन्जॉय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(जॉन अब्राहम आणि अंकिता श्रीवास्तवसोबत नाना पाटेकर)
मुंबई- 2007मध्ये प्रदर्शित झालेल्या 'वेलकम' सिनेमाने भरपूर यश मिळवले. या यशानंतर सिनेमाचा दुसरा भाग तुम्हाचे मनोरंजन करण्यासाठी तयार आहे. सोमवारी (6 जुलै) दिग्दर्शक अनीस बज्मीने सिनेमाच्या संपूर्ण टीमसोबत 'वेलकम बॅक'चा ट्रेलर लाँच केला. लाँचिंगवेळा अभिनेते उदय भाई अर्थातच नाना पाटेकर फन मूड दिसले. त्यांनी 'वेलकम बॅक'च्या स्टार्सकास्टसोबत धमाल-मस्ती केली.
लाँचिंगवेळी सर्व स्टार्स ब्लॅक आऊटफिट्समध्ये दिसले. नाना पाटेकरशिवाय जॉन अब्राहम अनिल कपूर, अभिनेत्री अंकित श्रीवास्तव, दिग्दर्शक अनीस बज्मी आणि निर्माते फिरोज नाडियाडवालासुध्दा उपस्थित होते. मात्र, इव्हेंटमध्ये श्रुती हसन, नसीरुद्दीन शाह, परेश रावल, डिंपल कपाडिया दिसले नाहीत.
हा सिनेमा 2007मध्ये रिलीज झालेल्या 'वेलकम'चा सीक्वेल आहे. मागील सिनेमांत अक्षय कुमार आणि कतरिना कैफने मुख्य भूमिका साकारली होती. परंतु यावेळी त्यांच्याऐवजी जॉन अब्राहम आणि श्रुती हसन यांना घेण्यात आले आहे. सिनेमाची रिलीज डेट 4 सप्टेंबर 2015 आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, ट्रेलर लाँचिंगचे PHOTOS...