मुंबईः आपल्या स्टायलिश अंदाजासाठी प्रसिद्ध असेलली अभिनेत्री कंगना रनोट बुधवारी रात्री मुंबई विमानतळावर कॅज्युअल लूकमध्ये अवतरली होती. तिने ब्लू डेनिम शर्ट आणि जीन्स कॅरी केली होती. शिवाय केस मोकळे ठेवले होते. हॅण्ड बॅग आणि गॉगल्सने तिने आपला हा लूक पूर्ण केला.
दुसरीकडे शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत मुंबईतील वांद्रा परिसरातील एका रेस्तराँमध्ये शाहिदच्या मित्रांसाठी क्वालिटी टाइम घालवताना दिसली. शाहिदचा जवळचा मित्र आणि प्रसिद्ध कोरिओग्राफर बॉस्को मार्टिससोबत मीरा रेस्तराँबाहेर दिसली. यावेळी मीरा अगदीच साध्या गेटअपमध्ये होती. तिने ब्लू शर्ट आणि डेनिम परिधान केले होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, एअरपोर्टवर क्लिक झालेले कंगनाचे आणि रेस्तराँबाहेरील मीरा राजपूतचे निवडक फोटोज...