आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिग्दर्शिकेच्या लग्नाचा शाही थाट, 5 कोटींच्या दागिन्यांत नटली, हेलिकॉप्टरमधून झाली पुष्पवर्षा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'दिल्लीवाली जालीम गर्लफ्रेंड' या चित्रपटाची दिग्दर्शिक जपिंदर कौर अलीकडेच विवाहबद्ध झाली. दुबईतील 168 मजली बुर्ज खलीफाच्या 122 व्या मजल्यावर हा शाही लग्नसोहळा पार पडला. जपिंदर कौरच्या लग्नाचा थाट डोळ्याचे पारणे फेडणारा होता. जपिंदर एका दिग्दर्शिकेसोबतच निर्माती, लेखिका आणि पेंटरसुद्धा आहे. जपिंदरचे हे अरेंज्ड मॅरेज आहे. 


दुबईतील तरुणासोबत थाटले लग्न.. 
दुबईस्थित हॉटेलियर हरप्रीत चड्ढासोबत जपिंदर विवाहबद्ध झाली. जपिंदरचा भाऊ तनप्रीत सिंग बावेजा हा दुबईतील फूड इंडस्ट्रीत कार्यरत आहे. त्याने दुबईत चाललेल्या तीन दिवसीय विवाहसोहळ्याची जबाबदारी घेतली होती. 


दुबईत पहिल्यांदाच झाली अशाप्रकारे पुष्पवर्षा...   
मुलीच्या लग्नात पुष्पवर्षा व्हावी, अशी जपिंदर कौरच्या आईची इच्छा होती. त्यांच्या इच्छेनुसार जपिंदरच्या मेंदी सेरेमनीत हेलिकॉप्टरमधून पुष्पवर्षा करण्यात आली. तब्बल 350 किलो गुलाबांच्या फुलांचा वर्षाव यावेळी करण्यात आला. दुबईच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या लग्नसोहळ्यात असा फुलांचा वर्षाव करण्यात आला. यासाठी परवानगी मिळवण्यासाठी सहा महिन्यांचा काळ लागला. DTFC, DCAA, GCA, मरीन लाइन्स, एन्वायरमेंटल सेफ्टी, कोस्ट गार्ड, हेलिकॉप्टर मिनिस्ट्री आणि डिफेन्स यांच्याकडून यासाठी परवानगी घ्यावी लागली.     

 

असा रंगला सोहळा..  

जपिंदर कौर आणि हरप्रीत चड्ढा यांचा दुबईत तीन दिवसीय लग्नसोहळा रंगला. या लग्नात 200 पाहुणे सहभागी झाले होते. दुबईतील प्रसिद्ध बुर्ज खलिफा आणि बुर्ज अल अरब याठिकाणी हा सोहळा रंगला. 


नववधूसाठी 5 कोटींचे दागिने... 
जपिंदर कौर हिने लग्नात तब्बल 5 कोटी 27 लाख 28 हजार रुपये किंमतीचे दागिने घातले होते. इतकेच नाही तर रिसेप्शनला तिने 22 कॅरेट सोन्याचा क्राउन घातला होता. त्यावर डायमंड्ससुद्धा लागले होते. जपिंदरचा मेंदी सेरेमनीचा ड्रेस डिझायनर रोहित बाल यांनी डिझाइन केला होता. तर लग्नासाठी दारसारा हाय फॅशनने आणि रिसेप्शनसाठी मनीष मल्होत्रा यांनी ड्रेस डिझाइन केला होता.

बातम्या आणखी आहेत...