आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • From Cricketers To Actors, Sanjay Kapoor’s Birthday Bash Saw A Bevy Of Celebs!

अनिल कपूरच्या भावाच्या बर्थ डे बॅशमध्ये अवतरले क्रिकेटर्स आणि बॉलिवूड अॅक्टर्स, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - डावीकडे - वर- सीमा खानसोबत संजय कपूर, खाली - सोहेल खान आणि तब्बू, उजवीकडे - वर- शोएब अख्तर, खाली - श्वेता बच्चन नंदा - Divya Marathi
फोटो - डावीकडे - वर- सीमा खानसोबत संजय कपूर, खाली - सोहेल खान आणि तब्बू, उजवीकडे - वर- शोएब अख्तर, खाली - श्वेता बच्चन नंदा

बॉलिवूड अभिनेता संजय कपूरचा आज वाढदिवस असून त्याने वयाची 50 वर्षे पूर्ण केली आहेत. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला संजयची पत्नी महीप कपूरने मुंबईत आपल्या राहत्या घरी एका जंगी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत केवळ बॉलिवूडचेच नव्हे तर क्रिकेट विश्वातील नामवंत खेळाडू संजयला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला पोहोचले होते.
अर्जुन कपूर, अनिल कपूर, रिहा कपूर, अंशुला कपूर, अमृता अरोरा, अरबाज खान, श्वेता बच्चन, सोहेल खान, तब्बू, समीर सोनी आणि त्याची पत्नी नीलम, सोहेल खानची पत्नी सीमा या पार्टीत सहभागी झाले होते. तर क्रिकेट विश्वातील झहीर खान, शोएब अख्तर, वसीम अक्रम पार्टीत दिसले.
संजयची पुतणी आणि अनिल कूपरची लेक सोनम कपूर सध्या फिल्मी शूटिंगमध्ये बिझी असल्याने या बर्थडे बॅशमध्ये सहभागी होऊ शकली नाही. संजय लवकरच शाहिद कपूर-आलिया भट स्टारर 'शानदार' या सिनेमाद्वारे मोठ्या पडद्यावर कमबॅक करत आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, संजय कपूरच्या बर्थडे बॅशची खास झलक...