आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: \'बॉयफ्रेंड\' रणवीरचा सिनेमा बघून दीपिका म्हणाली, \'So Proud Of U\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(रणवीर सिंह, दीपिका पदुकोण)
मुंबईः 5 जून रोजी रिलीज होणा-या 'दिल धडकने दो' या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग शुक्रवारी मुंबईतील महबूब स्टुडिओत ठेवण्यात आले होते. स्क्रिनिंगवेळी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली दीपिका पदुकोण. बॉयफ्रेंड रणवीर सिंहसोबत दीपिका स्क्रिनिंगस्थळी दाखल झोली. यावेळी अभिनेता आमिर खानचीही उपस्थिती होती.
स्क्रिनिंगला सिनेमाची संपूर्ण टीम हजर होती. दिग्दर्शिका झोया अख्तर, प्रियांका चोप्रा, अनुष्का शर्मा, शेफाली शाह, अनिल कपूर, निर्माता रितेश सिधवानी फोटोग्राफर्सना पोज देताना दिसले.
दीपिकाला रणवीरचा सिनेमा पसंत पडला. सिनेमाचे आणि विशेषतः रणवीरचे कौतुक करताना ती दिसली. सिनेमा बघितल्यानंतर दीपिकाने आपल्या ट्विटर पेजवर 'दिल धडकने दो' आणि रणवीरचे तोंडभरुन कौतुक केले. तिने ट्विट केले, "Can't get over what I just saw!!!😍😍😍My most awaited film of the year!!!#DilDhadakneDo #5thJune #MustWatch"
दीपिकाने केलेले दुसरे ट्विट काहीसे असे होते, , "Congratulations team DDD!!!@AnilKapoor @ShefaliShah_ @RanveerOfficial @priyankachopra @AnushkaSharma @FarOutAkhtar @ritesh_sid #ZoyaAkhtar"
तिस-या ट्विटमध्ये दीपिकाने रणवीरची स्तुती करताना म्हटले, , "And you
@RanveerOfficial ...YOU can do THIS ALSO!!?? #incredible! Soo proud of you!( and no...I'm not being biased...😉😋)"
आता दीपिकाच्या या ट्विटवर रणवीरची काय प्रतिक्रिया असणार याचीच उत्सुकता आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'दिल धडकने दो'च्या स्क्रिनिंगला क्लिक झालेली सेलेब्सची खास छायाचित्रे...