आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपिकाला KISS करताना दिसला रणबीर कपूरचा आतेभाऊ, पार्टीचे Inside Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दीपिकासोबत रणबीरचे आतेभाऊ अरमान आणि आदर जैन - Divya Marathi
दीपिकासोबत रणबीरचे आतेभाऊ अरमान आणि आदर जैन
मुंबईः अभिनेत्री दीपिका पदुकोणने 'पद्मावती' या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अलीकडेच तिच्या मुंबईतील घरी एक पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत रणवीर सिंगपासून ते बॉलिवूडमधील अनेक दिग्गज सेलिब्रिटी सहभागी झाले होते. या पार्टीत दीपिकाचा एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूर अनुपस्थित होता. पण त्याचे आतेभाऊ आदर आणि अरमान जैन आवर्जुन उपस्थित होते. हे दोघेही रणबीरची आत्या रीमा जैन यांची मुले आहेत. पार्टीत हे दोघेही दीपिकासोबत ड्रिंक करताना दिसले. शिवाय आदर जैनने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट
केला आहे. यात तो दीपिकाला किस करताना दिसतोय.
 
पार्टीत पोहोचले हे सेलेब्स.. 
- दीपिकाच्या पार्टीत स्टार किड्स लाइमलाइटमध्ये होते. यावेळी श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर, सैफ अली खानची मुलगी सारा अली खान आणि शाहिद कपूरचा सावत्र भाऊ ईशान खट्टर पार्टीत पोहोचले.
- सारा लवकरच अभिषेक कपूर दिग्दर्शित आणि सुशांत सिंह राजपूत स्टारर 'केदारनाथ' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तर जान्हवी आणि ईशान सैराट या मराठी चित्रपटाच्या हिंदी रिमेकमधून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेत आहेत.
 
शाहरुख-गौरीसह पोहोचले हे सेलेब्स..
दीपिकाच्या पार्टीत शाहरुख खान पत्नी गौरीसोबत पोहोचला. याशिवाय करण जोहर, अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदा, सोनाक्षी सिन्हा, सिद्धार्थ मल्होत्रा, आलिया भट, कृती सेनन, सुनील शेट्टीची मुलगी आणि अभिनेत्री अथिया शेट्टीसह अनेक सेलिब्रिटी या पार्टीत दिसले. 
 
पुढील स्लाईड्सवर बघा, दीपिकाच्या घरी झालेल्या पार्टीचे Inside Photos...
बातम्या आणखी आहेत...