आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धर्मेंद्र यांनी फॅन्ससोबत सेलिब्रेट केला 81वा बर्थडे, बघा Exclusive Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः बॉलिवूडचे सुपरस्टार धर्मेंद्र यांनी नुकतीच वयाची 81 वर्षे पूर्ण केली आहेत. गुरुवारी (8 डिसेंबर) त्यांचा वाढदिवस होता. आपल्या लाडक्या अभिनेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अनेक चाहते त्यांच्या मुंबईतील घराबाहेर जमले होते. धर्मेंद्र यांनी घरातील गार्डन परिसरात आपल्या चाहत्यांसोबत केक कापून वाढदिवस साजरा केला. त्यांचे अनेक चाहते त्यांच्यासाठी गिफ्ट्स घेऊन पोहोचले होते. कुणाच्या हाती सुंदर बुके होते तर कुणी धर्मेंद्र यांचे फोटोफ्रेम घेऊन त्यांच्या घरी पोहोचले होते. धर्मेंद्र यांचा जन्म 8 डिसेंबर 1935 रोजी नसरैली, लुधियाना येथे झाला. वाढदिवशी धर्मेंद्र हेमामालिनी यांच्या घरी पोहोचले होते. येथे त्यांनी त्यांच्यासोबत अर्धा तास घालवला होता. धर्मेंद्र दरवर्षी अतिशय साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करतात.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, धर्मेंद्र यांच्या बर्थडे सेलिब्रेशनचे हे एक्सक्लूझिव्ह फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...