आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'मसान\'च्या स्क्रिनिंगसाठी पोहोचली दीया-अदिती-डेजी, अनेक स्टार्सही दिसले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(दीया मिर्झा, आदिती राव हैदरी आणि डेजी शाह)
मुंबई- अभिनेत्री दीया मिर्झा, डेजी शाह आणि आदिती राव हैदरी सोमवारी (20 जुलै) 'मसान' सिनेमाचे स्क्रिनिंग अटेंड करण्यासाठी पोहोचल्या होत्या. सिनेमाची स्क्रिनिंग लाइटबॉक्स थिएटरमध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी दीया ब्लॅक आऊटफिटसोबत कोट परिधान करून पोहोचली होती. डेजी शाहने लाइट ग्रीन टॉप आणि फेडेड जीन्स कॅरी केली होती. तसेच, आदिती राव हैदरी ब्लॅक वन पीस आणि मॅचिंग स्टिलेटोसमध्ये स्पॉट झाली.
स्क्रिनिंगवेळी 'मसान'ची संपूर्ण टीम अर्थातच दिग्दर्शक नीरज घायवनसोबत मुख्य स्टार्स रिचा चढ्डा, श्वेता त्रिपाठी, विक्की कौशलसुध्दा उपस्थित होता. शिवाय अभिनेता अली फजल, वरुण शर्मा, विनय पाठकसुध्दा स्क्रिनिंग एन्जॉय करताना दिसले.
अलीकडेच झालेल्या 68व्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये या सिनेमाचे स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. या फेस्टिव्हलमध्ये 'मसान'ने दोन पुरस्कार नावी केलेत. इतकेच नाही तर स्क्रिनिंगनंतर पाच मिनीटांचे विशेष अभिवादनसुध्दा मिळाले होते, त्यामध्ये लोकांनी उभे राहून यासाठी टाळ्या वाजवल्या होत्या. सिनेमा येत्या 24 जुलैला रिलीज होत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'मसान'च्या स्क्रिनिंगमध्ये पोहोचलेल्या स्टार्सची खास झलक...