आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Drishyam Screening,Prachi Desai, Tisca Chopra And Many More Attend

'दृश्यम'च्या स्क्रिनिंगला सेलिब्रिटींची मांदियाळी, ब-याच दिवसांनी दिसली मराठमोळी पल्लवी जोशी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडून - अभिनेत्री प्राची देसाई, पल्लवी जोशी आणि टिस्का चोप्रा)
मुंबईः बॉलिवूड अभिनेता अजय देवगण स्टारर दृश्यम हा सिनेमा येत्या शुक्रवारी म्हणजे 31 जुलै रोजी थिएटरमध्ये दाखल होतोय. यानिमित्ताने बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी मंगळवारी मुंबईत स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. यावेळी टिस्का चोप्रा, प्राची देसाई, दिग्दर्शक निशिकांत कामत, केन घोषसह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. मराठमोळी अभिनेत्री पल्लवी जोशी ब-याच दिवसांनी मीडियासमोर आली होती.
अजय देवगणची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमात श्रिया सरनने त्याच्या पत्नीची भूमिका वठवली आहे. याशिवाय तब्बू, इशिता दत्त, रजत कपूर या कलाकारांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका यामध्ये आहेत. तब्बूने सिनेमात पोलिस ऑफिसरची भूमिका वठवली आहे.
'दृश्यम' हा सिनेमा मल्याळम, तामिळ, कन्नड आणि तेलगू या भाषांमध्ये यापूर्वी रिलीज झाला आहे.
(पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'दृश्यम'च्या स्क्रिनिंगला पोहोचलेल्या सेलेब्सची खास छायाचित्रे...)