आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ex lovers Ranbir Deepika Celebrates Diwali Together, Shares Their Diwali Plans

PHOTO: Ex-Lovers रणबीर दिपाकाचे दिवाळी सेलिब्रेशन, रांगोळी, मिठाई आणि फुलबाज्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवारी संध्याकाळी रणबीर कपूर आणि दिपीका पदूकोण ह्यांनी दिवाळीचा पहिला दिवस एकत्र सेलिब्रेट केला. लाल-पांढ-या साडीत दिपीका तर कुर्ता-पायजमा आणि त्यावर हाफ जॅकेट अशा पेहेरावात रणबीर कपूरने आपली फिल्म तमाशाचे प्रमोशन करता करता दिवाळीही साजरी केली.
रणबीर-दिपीकाने एकमेकांना काजुकतली भरवत एकमेकांचं तोंड गोड केलं. दिपीका आणि रणबीरने मिळून रांगोळीत रंग भरले. आणि फुलबाज्याही पेटवून फटाके उडवण्याचा आनंद साजरा केला. एवढंच नाही, तर दिवाळीत पत्ते खेळायची प्रथा आहे त्यामूळे थोडावेळ दोघांनी रमीचा डावही मांडला.
आता लक्ष्मीपूजन आणि उर्वरीत दिवाळीचा काय प्लॅन असं विचारल्यावर दिपीका म्हणाली, “मला खरं तर, बंगलोरला आमच्या घरी दिवाळी साजरी करायला जायची खूप इच्छा आहे. पण ते कसं जुळून येतंय, ते माहित नाही. कारण लक्ष्मीपूजनाला रात्री मी बच्चन फॅमिलीच्या घरी आयोजित पार्टीला जाणार आहेच. पाहू, नाहीच बंगलोरला जाणं झालं. तर मंबईतल्या घरीच पूजा करेन.”
आपल्या लहानपणीच्या दिवाळी सेलिब्रेशनच्या आठवणी सांगताना दिपीका म्हणते, “घरी छानपैकी डोक्याला चापूनचोपून तेल लावून मस्त सकाळी सकाळी अभ्यंगस्नान करायची पध्दत आमच्या बंगलोरला आहे. सकाळी उठून अभ्यंस्नान झाल्यावर घराला छान रोषणाई केली, की मन प्रसन्न होतं. तसंच सध्यांकाळीही जेव्हा आकाशकंदिल आणि पणत्यांनी घर सजवलं जाई, तेव्हा दिवाळी असल्यासारखी वाटायची.”
फिल्मी फॅमिलीत वाढलेल्या रणबीर कपूरची दिवाळी मात्र लहानपणापासून ह्यापेक्षा थोडी वेगळी होती. तो सांगतो, “लहानपणापासून आजतागायत लक्ष्मीपूजनाला आर के स्टुडियोजमध्ये पूजा करायला आम्ही जातो. तिथल्या कर्मचा-यांना भेटवस्तू देतो. नंतर आजीच्या घरी सगळं कुटूंब एकत्र येतं. तिथे गप्पा-गोष्टी भेटवस्तू देणे झाले की, मग घरी जाऊन घरची पूजा करायची. गेली दोन वर्ष मी बच्चन फॅमिलीच्या घरी दिवाळी पार्टीला जातो. आणि यंदाही जाणार आहे.”
तो पूढे म्हणतो, “मला खरं तर फटाके उडवायला आवडतं नाही. पण दोन तरी फुलबाज्या पेटवल्याच पाहिजेत. ही आमच्या वडिलांनी सांगितलेली प्रथा आहे. पण ह्याशिवाय फटाके अजिबात वाजवत नाही.”
पुढील स्लाइडमध्ये पाहा, रणबीर- दिपीकाचे दिवाळी celebration