आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हृतिकच्या बर्थडे पार्टीत पोहोचली Ex-वाइफ, 'काबिल' अॅक्ट्रेससह दिसले हे सेलेब्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
मुंबईः अभिनेता हृतिक रोशनने नुकतीच वयाची 43 वर्षे पूर्ण केली. 10 जानेवारी, 1974  रोजी जन्मलेल्या हृतिकने मंगळवारी त्यांच्या कुटुंबीय आणि मित्रांसोबत वाढदिवस साजरा केला. यावेळी हृतिकची एक्स वाइफ सुझान खानसुद्धा पार्टीत पोहोचली होती. संपुर्ण पार्टीत सुझान हृतिकसोबतच होती. इतकेच नाही तर दोन्ही मुले हृहान-हृदान आणि हृतिकसोबत सुझान एकाच गाडीतून पार्टीस्थळी दाखल झाली होती. या पार्टीत सुझानचा भाऊ आणि अभिनेता जाएद खानसुद्धा उपस्थित होता. हृतिक आणि सुझानचा घटस्फोट झाला आहे, मात्र तरीदेखील दोघांमधील मैत्री कायम असून मुलांसोबत अनेकदा ते एकत्र दिसत असतात. 

हृतिक-सुझान यांच्यात पुन्हा जवळीक निर्माण होत असल्याची चर्चा... 
सोशल मीडियावर हे कपल पुन्हा खासगी आयुष्यात एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र सुझानने या चर्चा अफवा असल्याचे म्हटले. ती म्हणाली होती, मी आणि हृतिक आता एकत्र नाहीत, मात्र आम्ही दोघेही चांगले पेरेंट्स नक्कीच असू. 13 डिसेंबर 2013 रोजी दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला होता.  

हृतिकच्या बर्थडे पार्टीत पोहोचले हे सेलेब्स... 
हृतिकच्या बर्थडे पार्टीत रोनित आणि रोहित रॉय, मानसी जोशी, अनु दीवान, गोल्डी बहलसह बरेच सेलेब्स सहभागी झाले होते. आगामी काबिल या सिनेमात हृतिकसोबत स्क्रिन शेअर करणारी अभिनेत्री यामी गौतमसुद्धा त्याला शुभेच्छा द्यायला पार्टीत पोहोचली होती. यावेळी जाएद खान पार्टीत त्याच्या मित्रांसोबत ऑटोतून आला होता.  

पुढील स्लाईड्समध्ये बघा, हृतिकच्या बर्थडे पार्टीचे PHOTOS...