आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Farah Khan's Eid Bash. Her Triplets Were Also All Dressed Up

फराहची ईद पार्टी : सेल्फी मूडमध्ये दिसले रितेश-जेनेलिया, सानिया मिर्झाचीही हजेरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिग्दर्शिका फराह खान, पत्नी जेनेलिया आणि टेनिसपटू सानिया मिर्झा यांच्यासोबत सेल्फी घेताना रितेश देशमुख. - Divya Marathi
दिग्दर्शिका फराह खान, पत्नी जेनेलिया आणि टेनिसपटू सानिया मिर्झा यांच्यासोबत सेल्फी घेताना रितेश देशमुख.
मुंबईः शनिवारी सर्वत्र उत्साहात ईदचा सण साजरा झाला. सामान्यांप्रमाणेच सेलिब्रिटींनीही मोठ्या जल्लोषात ईद साजरी केली. जावेद जाफरी आणि सलमान खान यांनी आपापल्या घरी ईदचे सेलिब्रेशन ठेवले होते. बॉलिवूडची प्रसिद्ध दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर फराह खान हिनेदेखील फिल्म इंडस्ट्रीतील काही निवडक मित्रमैत्रिणींना आपल्या घरी ईदच्या निमित्ताने जेवणासाठी आमंत्रित केले होते. रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख, तब्बू, सुशांत सिंह राजपूत, जॅकी श्रॉफ, सोनू सूद आणि टेनिसपटू सानिया मिर्झा हे सेलेब्स फराहच्या ईद सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले होते.
यादिवशी फराहची तिळी मुले पारंपरिक ड्रेसमध्ये नटलेली दिसली. फराहने आपल्या मुलांचे छायाचित्र ट्विटरवर शेअर करुन ट्विट केले, EID Mubarak !! Be a lil kinder today, hug a lil tighter ..n definitely eat a LOT more today!! God bless..
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, फराहच्या ईद सेलिब्रेशनची खास झलक...