आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानच्या लग्नाच्या प्रश्नावर बोलले वडील सलीम, जाणून घ्या काय म्हणाले?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सलमान खानचे वडील सलीम खान यांनी गुरुवारी (16 जुलै) मुलांसाठी 'जिओग्राफी विद बजरंगी भाईजान' नावाचे पुस्तक प्रकाशित केले. यानिमित्तावर सलमानच्या वडिलांनी त्याच्या लग्नाविषयी आणि बालपणीच्या काही गोष्टी शेअर केल्या.
मीडियासमोर बातचीत करताना सलीम खान यांना जेव्हा सलमानच्या लग्नाविषयी प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी सांगितले, 'या प्रश्नाचे उत्तर देवसुध्दा देऊ शकत नाही.' त्यांचे हे उत्तर ऐकून असे वाटते, की सलमानच्या कुटुंबीयांनीसुध्दा त्याच्या लग्नाचा विचार सोडून दिला आहे.
इव्हेंटवेळी सलीम यांनी सलमानवर अनेक मजेशीर कमेंट्स केल्या. सलमानच्या बालपणीच्या आठवणी शेअर करताना सलीम म्हणाले, 'सलमानला एक व्यक्ती शिकवण्यासाठी येत होता, त्यामुळे सलमान पास व्हायचा. परिक्षेच्या आधी तो सलमानची भेट घ्यायचा. काय नाव होते त्यांचे?...' यावर सलमान हसून म्हणाला, 'लक्षात नाहीये डॅडी!'. हा संवाद ऐकून तिथे उपस्थित सर्व हसायला लागले. सलीम आणि सलमान यांच्यात झालेला हा संवाद खरंच रंजक होता. कारण सलीम खान मुलगा सलमानवर सार्वजनिक ठिकाणी मजेशीर कमेंट्स करत होते. सोबतच सलमानसुध्दा हसून ते स्वीकारत होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या इव्हेंटचे PHOTOS...