आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gauri, Sidharth And Others Attend Karan Johar’S Screening Of Baahubali!

करणने ठेवले 'बाहुबली'चे स्क्रिनिंग, गौरी-सिद्धार्थसोबत पोहोचले अनेक स्टार्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(गौरी खान, सिद्धार्थ मल्होत्रा)
मुंबईः निर्माता करण जोहरने शुक्रवारी रिलीज झालेल्या 'बाहुबली' या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग गुरुवारी आयोजित केले होते. मुंबईतील यशराज स्टुडिओत हे स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. यावेळी शाहरुखची पत्नी गौरी खान, अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासह अनेक स्टार्स थिएटरबाहेर पडताना दिसले. गौरी खान स्काय ब्लू शर्टमध्ये दिसली. तर सिद्धार्थ ग्रे टीशर्ट आणि ब्लॅक कॅपमध्ये दिसला.
सोफी चौधरी, तमन्ना भाटिया, डिनो मोरिया, सिद्धार्थ शुक्ला, जॅकी भगनानी, तुषार कपूर, संजय कपूर, दिग्दर्शक विकास बहल आणि दिग्दर्शक अयान मुखर्जीसह बरेच सेलेब्स बाहुबली सिनेमा बघायला पोहोचले होते.
एस.एस. राजामौली दिग्दर्शित 'बाहुबली' हा एक काल्पनिक सिनेमा आहे. प्रभास, राणा डग्गुबती, अनुष्का शेट्टी आणि तमन्ना भाटिया स्टारर या सिनेमाचा करण जोहर निर्माता आहे.
पुढे पाहा, 'बाहुबली'च्या स्क्रिनिंगला पोहोचलेल्या स्टार्सची खास झलक...