आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गीता-भज्जीच्या मेंदी, संगीत, हळद, लग्न, रिसेप्शनचे हे 33 PHOTOS बघायला विसरु नका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बॉलिवूड अभिनेत्री गीता बसरा आता मिसेस हरभजन सिंग बनली आहे. 29 ऑक्टोबर रोजी जालंधर येथे दोघांचे ग्रॅण्ड वेडिंग झाले. 26 ऑक्टोबरपासून दोघांच्या लग्न विधींना सुरुवात झाली होती. हळद, मेंदी, संगीत, लग्नानंतर 1 नोव्हेंबर रोजी नवी दिल्लीत ग्रॅण्ड रिसेप्शन पार पडले.
क्लब कबाना येथे गीताची सेंत विधी
लग्नाच्या एका दिवसापूर्वी गीताच्या मामांनी तिला चूडा आणि नथ घालण्याची विधी पूर्ण केली होती. यावेळी गीता बसराची मावशी सोनू बाला, रमा आणि आई प्रवीण बसरासोबत बहीण रुबी बसरा, भाऊ राहुल बसरा, आजी ज्ञान देवी, आजोबा वेद प्रकाश बसरा, आजी सुदर्शन बसरा उपस्थित होते.
या विधीसुद्धा पार पडल्या...
जागो : लग्नाच्या एका दिवसाआधी वर आणि त्याची आई कलश घेऊन फिरतात. कलशवर ठेवलेल्या दिव्यात शेजारी आणि नातेवाईक तेल घालतात. सोबतच नाच-गाणीसुद्धा होतात.
बटणा : वराला अंघोळ घालून उटणे लावले जाते आणि तेल चढवले जाते. त्यानंतर त्याचे मामा त्याला दही घातलेल्या पाण्याने अंघोळ घालतात.
सेंत : या विधीपूर्वी हवन असते आणि त्यानंतर घराला तोरण लावले जाते.
भज्जी-गीताची संगीत सेरेमनी
मंगळवारी 27 ऑक्टोबर रोजी लेडीज संगीतचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम क्लब कबाना या हॉटेलमध्ये पार पडला. या कार्यक्रमात भज्जी आणि गीताने गायक मीका सिंग आणि गुरदास मानच्या गाण्यावर ठुमके लावले होते.
क्रिकेटर आरपी सिंह, प्रज्ञान ओझा, अशोक डिंडा आणि पार्थिव पटेल या कार्यक्रमात सहभागी झाले होते. दिल्लीहून आलेल्या डेकोरेटरने कार्यक्रमस्थळाला पंजाबी थीमवर सजवले होते. संगीत कार्यक्रमात हरभजनने अर्चना कोचर यांनी डिझाइन केलेला एक्वा ब्लू कलरचा बंद गळ्याचा कुर्ता आणि पिंक कलरची पगडी घातली होती. तर गीताने बबीता यांनी डिझाइन केलेला ग्रीन कलरचा लहेंगा परिधान केला होता.
मेंदी
भज्जी आणि गीताला 26 ऑक्टोबर रोजी मेंदी लागली होती. कलरफूल थीमवर मेंदीची विधी पूर्ण जाली. यामध्ये गीताचे नातेवाईक आणि मैत्रिणी सहभागी झाल्या होत्या. गीताला हॉटेलमध्ये तर हरभजनला त्याच्या घरी मेंदी लागली.
ग्रॅण्ड रिसेप्सशनला सेलिब्रिटींची मांदियाळी
रविवारी म्हणजेच 1 नोव्हेंबर रोजी दिल्लीतील ताज हॉटेलमध्ये गीता-भज्जीचे ग्रॅण्ड वेडिंग रिसेप्शन पार पडले. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, वन डे आणि टी-20चा कर्णधार महेंद्र सिंग धोनी, टेस्ट टीमचा कर्णधार विराट कोहली, स्टार क्रिकेटर युवराज सिंगसोबत अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. मोदींनी नवविवाहित दाम्पत्याला शुभेच्छा दिल्या. ते थोडाच वेळ कार्यक्रमात थांबले होते.
कसा होता गीता-हरभजनचा रिसेप्शनमधील अंदाज...
या रिसेप्शनमध्ये हरभजनने वेलवेटवर एम्ब्रॉयडरी केलेली शेरवानी आणि कुर्ता परिधान केला होता. तर गीताने ब्लू मिरर वर्क असलेला लहेंगा आणि एम्ब्रॉयडरीचा कुर्त्याला पसंती दिली. तिने डायमंड चोकर असलेला साइड मांग-टीका घातला होता. दोघांचेही हे ड्रेसेस अर्चना कोचर यांनी डिझाइन केले होते. वडोदराच्या ज्वेलर्सने दोघांसाठी ज्वेलरी डिझाइन केली होती. या रिसेप्शनमध्ये 1000 हून अधिक पाहुणे सहभागी झाले होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, हरभजन-गीता यांच्या मेंदी, हळद, चुडा, संगीत, लग्न आणि ग्रॅण्ड रिसेप्शनची ही खास झलक...