आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'हेट स्टोरी-3\'ने पहिल्या आठवड्यात कमावले 42cr, टीमने केली सक्सेस पार्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डेजी शाह, शरमन जोशी आणि जरीन खान, उजवीकडे भूषण कुमारला केक खाऊ घालताना जरीन
'हेट स्टोरी 3' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच आठवड्यात जवळपास 42 कोटींची कमाई केली. या आनंदात सिनेमाच्या टीमने एक सक्सेस पार्टी ठेवली. सिनेमाच्या स्टारकास्टसह निर्माता भूषण कुमारसुध्दा पोहोचला होता. पार्टीत करण सिंह ग्रोवर सामील झाला नाही. सिनेमात त्याने मुख्य भूमिका साकारली आहे.
यावेळी सर्वांनी केक कापून सेलिब्रेशन केले. यादरम्यान सिनेमाच्या टीमने माध्यमांसोबत बातचीत केली. सिनेमातील अभिनेता शरमन जोशी म्हणाला, की त्याला पूर्ण अपेक्षा होती सिनेमा हिट होणार आहे आणि असेच झाले.
डेजी शाह म्हणाली, की तिच्यासाठी हे यश खूप महत्वाचे आहे. तिने या सिनेमासाठी खूप कष्ट घेतले होते. सिनेमाची मुख्य अभिनेत्री जरीन खानसुध्दा या सिनेमाच्या यशाने आनंदी आहे.
सलमान खानची निर्दोष सुटका झाल्याच्या बातम्यांवर जरीन म्हणते, की त्याला बर्थडे पूर्वीच एक मोठे गिफ्ट मिळाले. म्हणून ती आता सलमानला कोणतेच गिफ्ट देणार नाहीये.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या पार्टीचे काही फोटो...
बातम्या आणखी आहेत...