आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'जय हो\'च्या अॅक्ट्रेसने उलगडले रहस्य, सलमानच्या सल्ल्यानंतरच केला \'हेट स्टोरी 3

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(ट्रेलर लाँचिंगदरम्यान शरमन जोशी, झरीन खान आणि डेजी शाह)
मुंबई- 'हेट स्टोरी 3' सिनेमाचा ट्रेलर शुक्रवारी (16 ऑक्टोबर) रिलीज करण्यात आला. यानिमित्त शरमन जोशी, करण सिंह ग्रोव्हर, झरीन खान आणि डेजी शाहसह सिनेमाची संपूर्ण स्टारकास्ट उपस्थित होती. सलमान खानसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी झरीन खान (वीर, 2008) आणि डेजी शाह (जय हो, 2014)ने सिनेमात अनेक बोल्ड सीन्स दिले आहेत. डेजी शाहने ट्रेलर लाँचिंगदरम्यान 'हेट स्टोरी 3'साठी सुपरस्टार सलमान खानने तिला समजावले होते. तिने सांगितेल, 'मी बॅकसीटवर होते, परंतु सलमानने मला सांगितले, की मी हा सिनेमा करावा. ही भूमिका 'जय हो' पेक्षा वेगळी आहे. हा जोन सुरक्षित नाहीये, मात्र मी हा सिनेमा करण्याची जोखिम पत्कारली.'
शूटिंगपूर्वी ठरली होती रिलीज डेट-
सिनेमाचा दिग्दर्शक विशाल पंड्याच्या सांगण्यानुसार या सिनेमाचे शूटिंग सुरु झाले तेव्हा रिलीज डेट ठरलेली होती. त्याने सांगितले, 'सिनेमाची रिलीज डेट पूर्वीच ठरलेली होती. याची शूटिंगसुध्दा सुरु झालेली नव्हती. सिनेमाचे शूटिंग याच वर्षी जुलैमध्ये सुरु झाले.'
सिनेमात तितकाच मसाला, जितका सेन्सॉरला मंजूर-
विशालला विचारण्यात आले, की या सिनेमासाठी सेन्सॉर बोर्डाकडून परवानगी मिळण्यात अडचणी आल्या नाही का? यावर तो म्हणाला, 'नाही, कारण आम्ही सिनेमात सेन्सॉरला जेवढा मसाला हवा आहे तितकाच दिलाय.'
बिपाशाच्या प्रश्नावर करणची टाळाटाळ-
एका रिपोर्टने जेव्हा करणला विचारले, की 'अलोन' सिनेमात त्याची आणि बिपाशाची केमिस्ट्री प्रेक्षकांनी पाहिली होती. त्यानंतर तुम्ही अनेकदा आऊटिंगवर दिसले. आता दोघे पुन्हा एखाद्या सिनेमात एकत्र दिसतील? या प्रश्नावर करणने टाळाटाळ करून दुसरा प्रश्न विचारण्याची विनंती केली. त्यानंतर करणला विचारण्यात आले, की 'हेट स्टोरी 3'मधील त्याचे इरोटिक सीन पाहून बिपाशाची काय प्रतिक्रिया होती, यावर तो म्हणाला, की हा प्रश्न तुम्ही बिपाशाला विचारा.
2 डिसेंबरला रिलीज होणार-
विशाल पंड्या दिग्दर्शित 'हेट स्टोरी 3' सिनेमा 2 डिसेंबरला रिलीज होत आहे. सिनेमात शरमन जोशी, करण सिंह ग्रोव्हर, झरीन खान, डेजी शाह यांच्या मुख्य भूमिका आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा ट्रेलर लाँचिंग इव्हेंटचे काही फोटो...